इतर

मका, बाजरी आणि ज्वारीवरील तांबडे ढेकूण (ढेकण्या)

Euschistus spp.

किडा

थोडक्यात

  • झाडे तांबड्या ढेकणाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई म्हणुन जास्त फुटवे काढतात.
  • प्रादुर्भावाच्या लक्षणांची वैशिष्ट्य म्हणजे पानांवर एका ओळीत छिद्रे निदर्शनात येतात.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास रोपे विकृत आकाराची आणि खुजी राहतात व उत्पादनात मोठी तूट होते.
  • कणसेही विकृत आकाराची, उशीरा तयार होणारी आणि बहुधा कमी दाणे भरलेली असतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

तांबड्या ढेकणाचा (ढेकण्या) चा उपद्रव शक्यतो कोवळ्या रोपांच्या किंवा झाडीच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात होत असतो. मुख्य खोडाला झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी कोवळी रोपे जास्त फुटवे काढतात. किड्यांनी पानांना खाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे पानांवर एका ओळीत किंवा समान अंतरावर छिद्रे निदर्शनात येतात. छिद्रांचे माप खूपच वेगवेगळे असु शकते पण बहुधा आयताकृती किंवा लांबुळकी असुन त्याभोवती पिवळी प्रभावळ असते. खोडावर ज्या ठिकाणी ढेकण्याने उपद्रव केलेला आहे तिथे चिकट सडणारा भाग दिसतो. जास्त प्रभावित झालेली झाडे खुजी, विकृत आकाराची होत असून कमी उत्पादन देतात. कणीसही विकृत आकाराचे, उशीरा तयार होणारे आणि कमी दाणे भरलेले असते. तांबडे ढेकूण चांगले उडु शकतात आणि पिकांत दूरवर झटकन पसरतात ज्यामुळे पीकाचे मोठे नुकसान होत असते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी टाचिनीड माशा आणि वॅस्पस, ढेकण्यांच्या अंड्यात अंडी घालतात आणि त्यांच्या अळ्या ढेकण्यांच्या अळ्यांना खातात. पक्षी आणि कोळीसुद्धा संक्रमण कमी करण्यात मदत करतात. निलगिरीचे तेल ह्या किड्यांना आणि त्यांच्या पिल्लांसाठी विषारी आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पायरेथ्रॉइड गटातील कीटनाशकांनी बीजप्रक्रिया केल्यास काही नियंत्रण मिळु शकते आणि कोवळ्या रोपांवरील नुकसान टाळता येते. बायफेनथ्रिनवर आधारीत कीटनाशकांची पानांवरील फवारणी देखील ह्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात मदत करते.

कशामुळे झाले

ह्या किड्यांचे पैलु प्रजाती अनुसार बदलतात. तपकिरी ढेकण्याचे प्रौढ ढालीच्या आकाराचे असतात व पंख ठिपकेदार तपकिरी व जाड असुन त्यांच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकार संरचना असते. अंडी पिंपाच्या आकाराची असतात आणि पुंजक्यांनी पानांवर घातली जातात. पिल्ले साधारण गोल, काळी आणि पंखहीन असतात. प्रौढ आणि पिल्ले आपल्या सोंडीने झाडाच्या विविध भागात टोचून, आतील भाग खाण्यासाठी विरघळवण्यासाठी आत द्रव सोडतात व त्या द्रवामुळे झाडाचे विरघळलेले भाग खात असतात. ह्यामुळेच झाडाचा आकार विकृत होतो किंवा वाढ खुंटते, आणि ह्या ढेकणांची संख्या जास्त असल्यास हे खूपच होते. कणसांवर आणि दाण्यांवर प्रादुर्भावाचे डाग आणि दोष आल्याने उत्पादाच्या प्रतीवर चांगलाच परिणाम होतो. ढेकण्यांसाठी तण आणि धान्य पिके जसे कि सोयाबिन, भाज्या आणि अल्फअल्फा अशा बर्‍याच यजमान पिकांची श्रुंखला आहे.


प्रतिबंधक उपाय

  • किडांची उच्च संख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • दोन शेतांमधील अडथळे ह्या किडींचे स्थलांतर कमी करण्यात मदत करू शकतात.
  • शेताचे ह्या किडींसाठी नियमित निरीक्षण करा व तण नियंत्रण व्यवस्थित करा.
  • कापणीनंतर शेतातुन झाडांचे सर्व अवशेष काढुन टाका.
  • मशागतीचा आभाव किंवा तण नियंत्रण व्यवस्थित न केल्यास उपद्रवाची जोखीम वाढते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा