इतर

काळे कटवर्म

Agrotis ipsilon

किडा

थोडक्यात

  • पानांवर अनियमित छोटी छिद्रे दिसतात.
  • खोड जमिनीच्या स्तरावर कापले जाते.
  • वाढ बाधीत होते किंवा मर होते.
  • रोपाची मर किंवा कोलमड होते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

कटवर्मस अनेक प्रकारच्या पिकांवर वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यात हल्ला करतात पण कोवळी रोपे त्यांना जास्त आवडतात. रोपे अंकुरायच्या वेळी जर सुरवंटांची जास्त संख्याअसेल आणि आजुबाजुच्या शेतातील तण, ही परिस्थिती जुळुन आली तर गंभीर नुकसान होऊ शकते. कोवळे सुरवंट जमिनीजवळच्या तणांवर किंवा उपलब्ध असल्यास मक्यावर ताव मारतात आणि कोवळ्या पानांवर अनियमित छोटी छिद्रे मागे सोडतात. त्यांचे प्रौढ दिवसाचा प्रकाश टाळण्यासाठी जमिनीत लपुन बसतात आणि रात्री बाहेर येऊन रोपांच्या बुडाशी खातात. कोवळी रोपे जमिनीत खेचली जातात. खोडांना जमिनीजवळ कापले जाते (तुटतात), ज्यामुळे वाढणार्‍या भागांचे नुकसान होते आणि वाढ बाधीत होते किंवा मर होते. कटवर्म खोडालाही पोखरतो ज्यामुळे जुनी रोपे मरगळतात किंवा जमिनदोस्त होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पस, माशा आणि गवती टोळासारखे कटवर्मचे अनेक भक्षक आहेत. बॅसिलस थुरिंगिएनसिस, न्युक्लोयोपॉलिड्रोसिस विषाणू आणि ब्युव्हेरिया बॅसियाना सारख्या बुरशीच्या जंतुंवर आधारीत जैव कीटनाशके लोकसंख्येचे परिणामकारक नियंत्रण करतात. अनावश्यक उपचार टाळुन नैसर्गिक भक्षकांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक कीड नियंत्रणाचा दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कटवर्म लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी क्लोरपायरीफॉस, बिटा-सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रीन, लँब्ड-सायहॅलोथ्रिन असणार्‍या उत्पादनांचा उपयोग केला जाऊ शकतो. पेरणीपूर्वी कीटकनाशकांचा वापर केल्यासही मदत मिळते पण ह्याची शिफारस तेव्हाच केली जाते जेव्हा मोठी लोकसंख्या अपेक्षित असते.

कशामुळे झाले

काळे कटवर्म जोमदार पतंग असतात आणि त्यांचे शरीर राखाडीसर तपकिरी ठिपकेदार असते. पुढचे पंख फिकट तपकिरी आणि गडद तपकिरी असतात तसेच बाहेरच्या कडांजवळ गडद चिन्हे असतात आणि पाठचे पंख पांढरे असतात. ते निशाचर असुन दिवसा जमिनीत लपतात. माद्या नरांसारख्याच दिसतात पण थोड्या गडद रंगाच्या असतात. त्या मोत्यासारखी पांढरी अंडी (जी नंतर फिकट तपकिरी होतात) एकेकटी किंवा पुंजक्याने, रोपांवर, आर्द्र जमिनीवर किंवा जमिनीतील भेगांमध्ये घालतात. अंडी ऊबुन अळ्या बाहेर येणे हे जास्त करुन तापमानावर अवलंबुन असते आणि सुमारे ३-२४ दिवस (३० अंश आणि १२ अंश क्रमश:) लागु शकतात. छोट्या अळ्या फिकट राखाडी, गुळगुळीत आणि तेलकट दिसतात तसेच सुमारे ५-१० मि.मी. लांबीच्या असतात. मोठ्या अळ्या गडद तपकिरी, सुमारे ४० मि.मी. लांबीच्या असतात आणि त्यांच्या पाठीवर पिवळ्या ठिपक्यांचे दोन पट्टे असतात. त्या रात्री खातात आणि दिवसा C आकारात मुडपुन जमिनीच्या पृष्ठभागाखालील उथळ बोगद्यात विश्रांती घेतात.


प्रतिबंधक उपाय

  • किडीची संख्या उच्चतम होण्यापूर्वी लवकर पेरणी करा.
  • ज्या शेतात आधी सोयाबीन लावली होती त्या शेतात मका लावणे टाळा.
  • पेरणीपूर्वी ३ ते ६ अठवडे आधी शेत नांगरुन अळ्यांना गाडा किंवा भक्षकांसाठी उघड्यावर पाडा.
  • शेताच्या आजुबाजुला सुर्यफुलांची रोपे लावा ज्याकडे काळे कटवर्म आकर्षित होतात.
  • पेरणीपूर्वी आणि पीक उगवल्यानंतर शेतातुन आणि आजुबाजूचे तण काढुन टाका.
  • प्रकाश आणि कामगंध सापळे लावुन पतंगांचे निरीक्षण करा किंवा त्यांना पकडा.
  • वारंवार मशागत करुन कटवर्म्सना भक्षकांसाठी उघड्यावर आणा.
  • काढणीनंतर पिकाचे अवशेष जमिनीत खोल गाडा.
  • पेरणी करण्यापूर्वी काही अठवडे शेत पडिक राहू द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा