Spodoptera litura
किडा
प्रादुर्भावाचे नुकसान पानांवर स्पष्टपणे दिसते. अळी पाने कुरतडून अनियमित आकाराची मोठी छिद्रे करतात व यामुळे संपूर्ण पानगळ देखील होऊ शकते. फुलकळी व शेंगावर देखील प्रादुर्भाव आढळून येतो. हलक्या जमिनीत मुळेदेखील प्रभावित होतात. जास्त प्रादुर्भावामुळे झाडाच्या फक्त फांद्या आणि देठच शिल्लक रहातात.
न्युक्लियर पॉलीहेड्रोसिस वायरस (एनपीव्ही) किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिसवर आधारीत जैविक कीटनाशके अंडी आणि अळ्यांच्या नियंत्रणासाठी वापरली जाऊ शकतात. भाताचा कोंडा, तपकिरी साखर किंवा काकवीवर आधारीत अमिष द्रावण देखील जमिनीवर संध्याकाळी पसरली जाऊ शकतात. कडुनिंबाचा पाला किंवा निंबोळी वनस्पतींचे अर्क आणि पोंगमिया ग्लोब्रा बियाणांचा अर्क शेंगदाण्याच्या पानांवर स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळीविरुध्द अत्यंत प्रभावी आहे. उदा. अॅझाडिराक्टिन १५०० पीपीएमला ५ मि.ली./ली या प्रमाणे किंवा एनएसकेइ ५% च्या या प्रमाणे अंड्याच्या टप्प्यावर वापरले जाऊ शकते ज्यामुळे अंडी ऊबण्यास प्रतिबंध होतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकनाशकाच्या अतिरेकी वापराने या किड्यांमध्ये त्याचा प्रतिरोध निर्माण होईल. लहान अळ्यांच्या नियंत्रणासाठी अनेक प्रकारची कीटनाशके, उदा. क्लोरपायरीफॉस (२.५ मि.ली/ली), इमॅमेक्टिन (०.५ ग्रॅ./ली),फ्ल्युबेंडियामाइड (०.५ मि.ली/ली), किंवा क्लोरॅन्टानिलिप्रोल (०.३ मि.ली./ली) तसेच इंडॉक्सिकार्ब आणि बायफेनथ्रिनवर आधारीत उत्पाद वापरले जाऊ शकतात. आमिषातील द्रावणानेसुद्धा प्रौढ अळ्यांची संख्या कमी केली जाऊ शकते.
स्पोडोप्टेरा लिटुराच्या अळ्यांमुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ पतंगाचे शरीर राखाडीसर तपकिरी असते आणि पुढील पंख अगदी वेगळेच असतात ज्याच्या कडांवर पांढरी लाटांसारखी चिन्हे असतात. पाठचे पंख अर्धपारदर्शक असुन त्यावर तपकिरी रंगाच्या ओळी कडांवर आणि शिरांवर दिसतात. माद्या शेकड्याच्या पुंजक्यांनी पानाच्या वरच्या बाजुला अंडी घालतात ज्यावर सोनेरी तपकिरी खवले असतात. उबल्यानंतर केसरहित फिक्या हिरव्या रंगांच्या अळ्या चटकन पसरतात आणि पानांवर ताव मारायला सुरवात करतात. प्रौढ अळ्या गडद हिरव्या ते तपकिरी रंगाच्या असुन त्यांच्या छातीवर गडद ठिपके असतात आणि पोटाकडील भाग नितळ असतो. दोन पिवळे उभे पट्टे बाजुने असतात ज्यावर काळे त्रिकोणी डाग असतात. नारिंगी रंगाचा जाडा पट्टा या डागांमधून जातो. अळ्या रात्रीच्या वेळी उपद्रव करतात आणि दिवसा जमिनीत लपुन बसतात. अळ्या आणि प्रौढ १५ ते ३५ अंश तापमानात चांगले वाढतात, आदर्श तापमान २५अंश असते. कमी आर्द्रता आणि जास्त किंवा कमी तापमानामुळे प्रजोत्पादन कमी होते आणि त्यांचे जीवनचक्र लांबते.