सोयाबीन

सोयाबीनवरील ढेकण्या

Pentatomidae

किडा

थोडक्यात

  • पान किंवा खोडावर खूप कमी नुकसान होते.
  • ढेकण्या पिकाच्या परिपक्वतेदरम्यान शेंगा आणि दाणे खातात.
  • दाणे विकृत, अविकसित किंवा निरस्त होऊ शकतात.
  • जुने दाणे रंगहीन असतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

पीक काढणीपूर्वी सोयाबीनवरील ढेकण्याचे संक्रमण ओळखण्यास कठिण असते. पिल्ले आणि प्रौढ दोन्ही सोयाबीनच्या शेंगा आणि दाणे खातात आणि खाल्ल्याची काहीच लक्षणे पान किंवा खोडावर सोडत नाहीत. काढणी करताना कोवळे दाणे विकृत, अविकसित किंवा निरस्त असतात. जुने दाणे रंगहीन आणि आक्रसलेले असतात. ढेकण्या रोपाचा इतर भागही खातात. जिथे किड्यांनी टोचले तिथे छोटे तपकिरी किंवा काळे डाग दिसतात. शेंगा आणि दाणे उशीरा परिपक्व होतात आणि शेंगा बारीक व संख्येने कमी असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी माशा किंवा वॅस्पसना प्राधान्य देऊन ढेकण्याची संख्या कमी करा. हे शत्रु ढेकण्यावरच अंडी घालतात. परजीवी झालेली अंडी विशेषत: गडद असतात. या मित्रकिडींच्या अळ्या किड्यांच्या अळ्यांना आणि प्रौढांना अंड्याच्या आतुनच खातात. पक्षी आणि कोळ्यासारखे भक्षक देखील संक्रमण कमी करु शकतात. युकालिपटस युरोग्रँडिसचे तेलही आपण वापरु शकता. हे तेल ढेकण्याच्या किडी आणि पिल्लांसाठी विषारी आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटनाशक वापरण्यापूर्वी किड्यांची संख्या आणि प्रजाती तपासण्यासाठी शेताचे निरीक्षण करा. गरज भासल्यास मेथामिडोफॉस, पायरेथ्रॉइड आणि एंडोसल्फान असणारे उत्पाद वापरुन ढेकण्याची संख्या कमी केली जाऊ शकते.

कशामुळे झाले

ढेकण्याच्या बर्‍याच प्रजाती सोयाबीनवर हल्ला करतात. अॅक्रोस्टरनम हिलारे हा सर्वात जास्त नुकसान करतो. प्रौढ १.३ सें.मी. लांबीचे, हिरवे आणि ढालीच्या आकाराचे असतात. त्यांना वास येणारे किडे असे ही म्हटले जाते कारण भक्षकांना पळवुन लावण्यासाठी ते घाणेरडा वास सोडतात. कोवळ्या शेंगा आणि विकसित होणार्‍या दाण्यात आपली सोंड खुपसुन पाचक रस सोडतात आणि तयार झालेले द्रावण शोषतात. पिल्ले जवळजवळ गोलाकार, पंखहीन आणि काळी असुन डोक्यावर लाल ठिपका असतो. अंडी पिंपाच्या आकाराची असुन पुंजक्याने घातली जातात.


प्रतिबंधक उपाय

  • ढेकण्याची उच्च संख्या टाळण्यासाठी लवकर लागवड करा.किड्यांची चिंताजनक संख्या नाही हे पहाण्यासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा