सोयाबीन

तंबाखुवरील कळ्या खाणारी अळी

Chloridea virescens

किडा

थोडक्यात

  • कळ्या, फुल आणि कोवळ्या शेंड्यांना नुकसान होते.
  • पिवळ्या कळ्या गळतात.
  • फळांच्या बुडाशी चावल्याने छिद्रे दिसतात.
  • पोकळ फळ आणि पृष्ठभागावर खोबणी तयार होतात.
  • पिवळट- हिरवट ते तपकिरी अळ्यांच्या पाठच्या बाजुला तपकिरी पट्टे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

9 पिके
कोबी
हरभरा
कापूस
लेट्यूस
अधिक

सोयाबीन

लक्षणे

पिकाप्रमाणे लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. अळ्या, कळ्या, फुल आणि कोवळ्या शेंड्यातील वाढीत पोखरुन उपद्रव करतात, ज्यामुळे वाढणाऱ्या भागांना नुकसान होते. जर इतर काही पुनरुत्पादन भाग उपलब्ध नसतील तर झाडांचे इतर भाग म्हणजे पान, देठ आणि खोडांवरही हल्ला केला जातो. हल्ला झालेल्या कळ्या पिवळ्या पडुन गळतात. कापसात आणि शेंगवर्गीय पिकात, छिद्र आणि ओलसर विष्ठा बोंड आणि शेंगांच्या बुडाशी दिसते. सुरवंटांनी खाल्ल्यामुळे आतील भाग पोकळ होऊन पृष्ठभागावर खोबणी तयार होणेही सर्वसामान्य आहे. काही वेळा फळे आतुन पूर्णपणे रिकामी केली जातात आणि ती कुजू लागतात. कपाशीत नुकसानाची संरचना आणि जखमांची पातळी ही मक्यावरील कणसातील अळीच्या नुकसानासारखेच दिसते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस थुरिंगिएनसिस, नोसेमा प्रजाती, स्पिकॅरिया रायलेयी किंवा न्युक्लियर पॉलिहेड्रोसिस व्हायरस या जंतुंवर आधारीत उत्पाद फवारुन तंबाखुवरील कळ्या खाणार्‍या अळीचा प्रभावी रीतीने नायनाट केला जाऊ शकतो. वॅस्पस (पोलिस्टेस प्रजाती), बिग आय बग्ज, डॅमसेल बग्ज, मायन्युट पायरेट बग्ज (ओरियस प्रजाती) आणि कोळी यासारख्या नैसर्गिक शत्रुंना प्रोत्साहन द्यावे. भाजीपाला पिकात ट्रायकोग्रामा प्रेटियोसम आणि कार्डियोचाइल्स नायग्रिसेप्स आणि इतर पिकात कोटेशिया मार्जिनिव्हेन्ट्रिससारख्या परजिवीत येतात. इतर परजिवीत आर्चिटाज मार्मोरॅटस, मिटियरस ऑटोग्राफे, नेटेलिया सायि, प्रिस्टोमेरस स्पिनॅटर आणि कॅम्पलेटिस प्रजातीचे अनेक किडे येतात. बॅसिलस थुरिंगिनेन्सिस, नोसेमा प्रजाती, स्पिकारिया प्रजाती किंवा न्युक्लिअर पॉलीहेड्रोसिस विषाणूवर आधारीत उत्पाद तंबाखुवरील कळ्या खाणार्‍या अळीला प्रभावीपणे दाबण्यासाठी फवारले जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या कीटकांचे नियंत्रण विविध घटकांमुळे विशेषतः कठीण झाले आहे. क्लोरँट्रॅनिलिप्रोल, फ्लुबेंडायामाइड किंवा एसफेनव्हॅलरेट असणार्‍या कीटकनाशकांचा वापर तंबाखुवरील कळ्या खाणारी अळीसाठी केला जाऊ शकतो. काही मुख्य कीटकनाशकांचा प्रतिरोध सामान्य आहे, इतरांमध्ये पायराथ्रॉइड उपचार येतात. मित्र किडी मारल्या जाऊ नयेत म्हणुन विस्तृत श्रेणींची कीटकनाशके वापरु नयेत.

कशामुळे झाले

क्लोरिडे व्हारेसेन्स नावाच्या तंबाखुवरील कळ्या खाणार्‍या अळीमुळे नुकसान होते. सोयाबीन आणि कापुस (बहुधा वाळवंटी प्रदेशातील) यासारख्या अनेक पिकांवरील हा महत्वाचा उपद्रव आहे. पतंग (पंखांसकट) तपकिरीसर रंगाचे असतात, काही वेळा हलकी हिरवी छटाही दिसते. पुढच्या पंखांवर आडवे आरपार तीन गडद पट्टे असतात, ज्यांची कडा काही वेळा पांढरट किंवा दुधाळ रंगाची असते. पाठचे पंख पांढरट असुन कडांच्या बाजुने गडद पट्टे असतात. माद्या गोलाकार, चपटी अंडी, फुल, फळ आणि शेंड्यांवर घालतात. मोठ्या अळ्या अत्यंत नुकसानकारक असतात कारण त्या फुल आणि फळांना नुकसान करतात आणि हंगामात नंतरपर्यंत करीतच रहातात (ज्यामुळे रोपांना त्याची भर करता येत नाही). जर तापमान २० अंशाच्या असपास असेल तर हे सुमारे २५ दिवसांपर्यंत जगतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास संवेदनशील वाण लावा.
  • कमी कालावधीचे वाण लावा किंवा हंगामात लवकर लागवड करा.
  • फुलधारणेच्या उच्चीच्या काळानंतर १-२ अठवड्यात उपद्रवाच्या चिन्हांसाठी लक्ष ठेवायला सुरवात करा.
  • पतंगांना आकर्षित करुन निरीक्षणासाठी किंवा पकडण्यासाठी कामगंध सापळे वापरा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • तण नियंत्रणाच्या चांगल्या योजनेची आखणी करुन राबवा.
  • खते संतुलित राखा.
  • जास्त सिंचन करु नका.
  • शक्य झाल्यास लवकर पक्वतेसाठी पिकाचे व्यवस्थापन करा.
  • आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा