ज्वारी

लष्करी अळी

Spodoptera frugiperda

किडा

थोडक्यात

  • रोपाच्या सगळ्या भागांवर खाल्याने नुकसान दिसते.
  • पानांच्या कडा फाटतात.
  • पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

25 पिके

ज्वारी

लक्षणे

लष्करी अळीच्या अळ्यांनी झाडाच्या भागांना खाण्याने नुकसान होते. कोवळ्या अळ्या सुरवातीला पानांचे पृष्ठभाग एका बाजुने खातात आणि दुसरी बाजु तशीच (खिडकीसारखे खाणे) शाबूत ठेवतात. कळ्या आणि शेंडे नाहीसे होईपर्यंत रोपांना खाल्ले जाते. मोठ्या अळ्या पानांवर वैशिष्ट्यपूर्ण छिद्रांची नक्षी आणि पानांच्या फाटलेल्या कडा तसेच विष्ठांच्या ओळी सोडतात. त्या झाडाचे बुड देखील कापू शकतात किंवा ते प्रजनन संरचना आणि कोवळ्या फळांवर देखील हल्ला करु शकतात. जास्त संक्रमण झाल्यास, लष्करी अळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पानगळ होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पसमध्ये कोटेशिया मारजिनिव्हेन्ट्रिस चेलोनस टेक्सानस आणि सी.रेमस येतात. सर्वसामान्यपणे आर्चिटास मारमोराटस नावाची परजीवी माशी जास्त वापरली जाते. बीटल्स, स्पाइन्ड सोल्जर बग्ज, फ्लॉवर बग्ज, पक्षी किंवा उंदीर भक्षकात येतात. बॅसिलस थुरिंगिएनसिस किंवा बॅक्युलोव्हायरस स्पोडोप्टेरा तसेच स्पिनोसॅड किंवा अॅझाडिराक्टिन असणार्‍या जैविक कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ शकते. मक्यावर, लाल वाळू, खडे मीठ,कोळशीची पूड किंवा फ्लाय राख वापरल्याने अळ्यांना खाण्याचा वीट येतो आणि मारल्या जातात (१००%, ९८%, ९०% आणि ८०% प्रभावकारीता क्रमश:).

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शिफारस केलेल्या कीटकनाशकात एसफेनव्हलरेट, क्लोरोपायरिफॉस, मॅलॅथियॉन आणि लांबा-सायहॅथ्रिन येतात. प्रौढ अळ्यांसाठी विषारी अमिषाचे सापळेही शेतकर्‍यांना पुरविले जातात.

कशामुळे झाले

बहुधा खवल्यांनी आच्छादीलेली १००-३०० अंडी घनदाट पुंजक्याने पानांच्या खालच्या बाजुला घातली जातात. अळ्या गव्हाळ रंगाच्या किंवा हिरव्या ते जवळपास काळ्या रंगाच्या असुन बगलेच्या बाजुने पट्टे आणि पिवळसर रेषा पाठीवर असतात. पतंगांचे मागचे पंख पांढरे पारदर्शक असतात आणि पुढचे पंख तपकिरी असुन त्यावर उंचवटलेली फिकट आणि गडद चिन्हे विखुरलेली असतात. प्रत्येक पुढच्या पंखाला लक्षणीय पांढरट डाग टोकाकडील भागात असतो. जीवनचक्राच्या विविध टप्प्यांचा काळ हा खाणे आणि हवामानावर अवलंबुन असतो. थंड,ओल्या वसंत ऋतु नंतर ऊबदार, दमट हवामान या किड्यांच्या जीवनचक्राला मानवते.


प्रतिबंधक उपाय

  • जास्त संवेदनक्षम वाण लावा.
  • पतंगाच्या उपस्थितीची निगराणी करा आणि प्रकाश किंवा कामगंध सापळे वापरुन त्यांना मोठ्या संख्येने पकडा.
  • त्यांची उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • तण नियंत्रणाची शिफारस करण्यात येते.
  • सतत होणारे नुकसान टाळण्यासाठी लवकर काढणी करा.
  • उच्च तापमानात अळ्या आणि कोषांना उघडे पाडण्यासाठी जमिन नांगरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा