वांगी

टोमॅटोवरील टुटा नागअळी

Tuta Absoluta

किडा

थोडक्यात

  • अळ्या पानात पोखरून राखाडी ते पांढर्‍या अनियमित रेषा तयार करतात ज्या नंतर करपतात.
  • फळांना खोलपर्यंत पोखरतात आणि खिडक्या तयार करतात.
  • या जागा दुय्यम जंतुंद्वारे वापरल्या जातात व त्यामुळे फळकुज होते.

मध्ये देखील मिळू शकते


वांगी

लक्षणे

पीकाच्या कोणत्याही काळात उपद्रव होऊ शकतो आणि ते झाडाच्या कोणत्याही भागास प्रभावित करू शकतात. शेंडे, नवीन पालवी आणि फुले या अळ्यांना खायला आवडतात. अळ्या पानात पोखरून राखाडी ते पांढर्‍या अनियमित रेषा तयार करतात जे नंतर करपतात. अळ्या खोडदेखील पोखरु शकतात ज्यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. फळांवर जिथुन अळ्या बाहेर पडल्या किंवा आत शिरल्या त्या जागी काळी चिन्ह दिसतात. या छिद्रातुन दुय़्यम जंतु प्रवेश करतात ज्यामुळे फळ कूज होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

टुटा अॅब्सोल्युटाला खाणारे बरेच भक्षक सापडले आहेत: इतर प्रजातीत परजीवी वॅस्प ट्रायकोग्रामा प्रेटोयोसम आणि नेसिडियोकोरिस टेन्युइस बग्ज आणि मॅक्रोलोफस पिग्मियस ही येतात. बर्‍याचशा बुरशीच्या जाती जसे कि मेटार्हिसझियम अॅनिसोप्लि आणि ब्युव्हेरिया बॅसियाना ज्या अंडी, अळी आणि प्रौढांवर हल्ला करतात. निंबोळी अर्क किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिस किंवा स्पिनोसॅड असलेली कीटकनाशके देखील काम करतील.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. किड्यांची लपुन रहाण्याची सवय, उच्च प्रजोत्पादन दर आणि प्रतिकार निर्माण करण्याची क्षमता यामुळे टुटा अॅब्सोल्युटाच्या उपद्रव व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली कीटनाशके वापरणे व्यवहार्य नाही. किड्यांमध्ये प्रतिकारकता तयार होऊ नये म्हणुन, अनेक प्रकारची कीटकनाशके जसे की इंडोक्सकार्ब, अॅबामेक्टिन, अॅझाडिराक्टिन,फेनॉक्सिकार्बे + ल्युफेन्युरॉन यांना आलटून पालटून वापरा.

कशामुळे झाले

टुटा अॅब्सोल्युटाच्या उच्च प्रजोत्पादन दरामुळे, सुमारे १२ पिढ्या प्रति वर्षी देणारा हा टोमॅटोवरील विनाशकारी उपद्रव आहे. माद्या दुधाळ पांढर्‍या रंगाची सुमारे ३०० अंडी पानांच्या खालच्या बाजुला घालतात. २६-३० अंश सेल्शियस तापमानात आणि ६०-७५% सापेक्ष आर्द्रता असताना अंडी ऊबतात. अळ्या फिकट हिरव्या आणि डोक्यामागे वैशिष्ट्यपूर्ण काळे पट्टे असलेल्या असतात. अनुकूल परिस्थितीत ( तापमान,आद्रता) त्यांची वाढ सुमारे २० दिवसात पूर्ण होत असते. प्रौढ चंदेरीसर तपकिरी, ५-७ मि.मी. लांबीचे असतात आणि दिवसा पानात लपतात. टुटा अॅब्सोल्युटा अंडी, अळी किंवा प्रौढांच्या रुपात, पानावर किंवा जमिनीत सु्प्तावस्थेत राहू शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • जंतुविरहित रोप लावा.
  • प्रौढांची संख्या समजून घेण्यासाठी व मोठ्या संख्येने पकडण्यासाठी चिकट सापळे किंवा कामगंध सापळे लावा.
  • प्रभावित झाडे आणि त्यांचे भाग वेचून नष्ट करा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे पर्यायी यजमान असलेल्या झाडांचे नियंत्रण करा.
  • जमिन नांगरुन चांगळी तापू द्या किंवा त्यावर प्लास्टिक अच्छादन पसरा.
  • संक्रमित झाड पीक घेतल्यानंतर काढुन नष्ट करा.
  • मागच्या पिकातील प्रादुर्भाव पुढच्या पिकात वाहून येणे टाळण्यासाठी, पुढील पिकाची लागवड करण्यापूर्वी किमान 6 आठवडे प्रतीक्षा करा.
  • जास्त कालावधीसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा