वांगी

वांग्याच्या पानांना मुडपणारा किडा

Eublemma olivacea

किडा

थोडक्यात

  • मधल्या शिरेजवळुन पानांची उभी गुंडाळी होते.
  • गुंडाळीच्या आतुन अळ्या पानांच्या पेशी खातात.
  • बाधीत पाने तपकिरी, मरगळलेली आणि सुकी दिसतात.
  • गंभीर संसर्गाने पानगळती होते ज्यामुळे पीकाचे चांगलेच नुकसान होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

वांगी

लक्षणे

फक्त अळ्याच पानांना नुकसान करतात. प्राथमिक लक्षणे म्हणजे पानांची उभी गुंडाळी होणे ज्याच्या आत अळ्या असतात. तिथुन त्या पानांच्या आतल्या हिरव्या पेशी खातात. बहुधा नुकसान रोपाच्या वरच्या भागात होते. गुंडाळी झालेली पाने तपकिरी, मरगळलेली आणि सुकी होऊ शकतात. जेव्हा नुकसान जास्त असेल, तेव्हा तपकिरी होणे पूर्ण रोपाच्या भागात पसरते आणि पानगळती होते. जर किड्यांची संख्या नियंत्रणात नाही ठेवली गेली तर पीकाचे खूप नुकसान होऊ शकते. तरीपण हे किडे रोपाच्या वाढीसाठी आणि पीकासाठी मोठ्ठा धोका नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्प जाती जसे कि कोटेशिया एसपीपी द्वारे संसर्गाचे जैविक नियंत्रण केले जाऊ शकते. शिकारी किडे जसे कि नाकतोडा किंवा फायदेशीर लेडीबर्ड बीटल जातीसुद्धा ह्या किड्यांचे नियंत्रण करु शकतात. नेमॅटोडस जसे कि स्टेनेरनेमा एसपीपीसुद्धा ह्या किड्यांच्या नियंत्रणात मदत करु शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन प्रथम ठेवा. जर कीटनाशकांची गरज लागली तर ज्या उत्पादात कार्बारिल किंवा मॅलेथियॉन आहे त्याची फवारणी वांग्यातील पानांना मुडपणार्याी किड्यांच्या नियंत्रणासाठी करा.

कशामुळे झाले

प्रौढ मध्यम आकाराचे, हलक्या तपकिरी ते ऑलिव्ह हिरव्या रंगाचे पतंग असतात ज्यांच्या पुढच्या पंखांच्या बाहेरच्या बाजुला तीन बाजुंनी गडद धब्बा असतो. पाठचे पंख पारदर्शक सफेद असतात. पतंगांची मादी ८-२२ च्या संख्येने पानांच्या वरच्या बाजुला अंडी घालते, जास्त करुन ताज्या पानांवर. ३-५ दिवसात अळ्या बाहेर येतात. त्या जांभळ्या-तपकिरी आणि गुटगुटीत असतात, त्यांच्या ढुंगणावर पिवळे किंवा क्रीम रंगाच्या खळ्या असतात आणि पाठीवर लांब केस असतात. अळ्या वाढण्यास ४ अठवडे लागतात. मग त्या गुंडाळलेल्या पानातच कोषात जातात. अजुन ७-१० दिवसांनी प्रौढ पतंगांची नवी पिढी बाहेर पडते. हवामानाप्रमाणे दर वर्षी साधारणपणे ३-४ पिढ्या तयार होतात.


प्रतिबंधक उपाय

  • मोसमात उशीरा रोपणी करा.
  • चांगली खत योजना करुन निरोगी रोपे वाढवा.
  • रोपांवर आणि शेतावर रोगाच्या किंवा किड्याच्या कोणत्याही लक्षणासाठी नजर ठेवा.
  • संसर्गित पाने आणि सुरवंटांना हाताने काढुन नष्ट करा.
  • रोगी पाने, सुरवंट आणि आपला कचरा जाळुन टाका.
  • सरसकट कीटनाशकांचा उपयोग टाळा जी ह्या किड्यांच्या नैसर्गिक शत्रुंनाही नष्ट करतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा