ऊस

जांभळा खोडकिडा

Sesamia inferens

किडा

थोडक्यात

  • सुरवंट खोडात किंवा ओंबीच्या बुडाला पोखरुन छिद्र करतात.
  • झाडाच्या या भागांवर बाहेर निघण्यासाठी केलेली छिद्र स्पष्ट दिसतात.
  • पाणी आणि पोषकांच्या कमतरतेमुळे प्रादुर्भावग्रस्त भागांची मर होते.
  • खोडाला उभे चिरले असता आतील भाग वाळलेला असतो आणि यालाच 'मृत गाभा' लक्षण असे म्हणतात, आत अळ्या तसेच विष्ठाही निदर्शनात येते.

मध्ये देखील मिळू शकते

7 पिके

ऊस

लक्षणे

सुरवंटांनी खाल्ल्याने पिकाचे नुकसान मुख्यत: होते. ते खोडाला किंवा ओंब्याच्या बुडाजवळ पोखरतात आणि आतील भाग खातात ज्यामुळे पाणी आणि पोषकांचे वहन थांबते. खोड आणि कांड्यांवर सुरवंट बाहेर निघण्याची छिद्र दिसतात. पाणी आणि पोषकांच्या कमतरतेमुळे प्रादुर्भावग्रस्त भागांची मर होते. खोडाला उभे चिरले असता आतील भाग वाळलेला असतो आणि यालाच 'मृत गाभा' लक्षण असे म्हणतात, आत अळ्या तसेच विष्ठाही निदर्शनात येते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

टेलेनोमियस आणि ट्रायकोग्रामा गटातील बरेचसे परजीवी वॅस्पस खोड किड्याच्या अंड्यात आपली अंडी घालतात आणि लोकसंख्येला आळा घालण्यात मदत करतात. उदा. अंकुरल्यानंतर १२ आणि २२ दिवसांनी अंड्यांना खाणारे ट्रिकोग्रामा चहिकोनिस (८ कार्ड प्रति हेक्टर) सोडले जाऊ शकतात. अॅपान्टेलेस फ्लाव्हाइप्स, ब्रॅकॉन चिनेन्सिस आणि स्टरमियोप्सिस इनफेरेन्स वॅस्पस अळ्या खातात. शेवटी झॅन्थोपिनप्ला आणि टेट्रास्टिचस जाती कोषांवर हल्ला करतात. ब्युव्हेरिया बॅसियाना आणि बॅसिलस थुरिंगिएनसिस जिवाणूच्या अर्कावर आधारीत जैविक बुरशीनाशकांचा उपयोग जांभळ्या खोडकिड्याविरुद्ध परिणामकारक आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उपद्रवाच्या संख्येचे नियंठण करण्यासाठी कीटनाशकांचे रोगप्रतिबंधक उपचार
फवार्‍याच्या (उदा. क्लोरँट्रिनिलिप्रोल) किंवा दाण्यांच्या रुपात वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

सेस्मिया इनफर्न्स नावाच्या जांभळ्या खोडकिड्यामुळे लक्षणे उद्भवतात. खोडात किंवा जमिनीतील झाडांच्या अवशेषात अळ्या कोषात जातात आणि वसंत ऋतुत जेव्हा आल्हाददायक वातावरण असते तेव्हा प्रौढ म्हणुन बाहेर येतात. पतंग बारीक, गुबगुबीत आणि फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि शरीर आणि डोक केसाळ असते. पुढचे पंख पिवळसर असतात आणि सोनेरी चिन्हांकित किनार असते. पाठचे पंख अर्धपारदर्शक पांढरे असुन त्यावर पिवळसर शिरा असतात. माद्या शिकार्‍यांपासुन वाचविण्यासाठी पर्णकोषांच्या मागे गोलाकार, फिकट आणि पिवळसर हिरवी अंडी पुंजक्यांनी बर्‍याचशा रांगात घालतात. सुरवंट २०-२५ मि.मी. लांब, रंगाने गुलाबीसर, लाल तपकिरी डोक्याचे आणि पट्टे नसलेले असतात. ते खोडाला पोखरुन आतील भाग खातात.


प्रतिबंधक उपाय

  • जास्त लवचिक प्रकारचे वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • इतर शेतकर्‍यांबरोबर मिळुन पेरणी करा म्हणजे किड्यांची संख्येतील वाढ टाळता येईल.
  • एकाच वेळी परिपक्व होणारे वाण लावा.
  • लवकर पेरणी केल्यानेही टोकाची लोकसंख्या टाळता येते.
  • दाट लागवड करा जेणेकरून पतंगांना पानात शिरणे कठिण होईल.
  • शेंगवर्गीयांचे आंतरपिक घ्या.
  • किड्यांना आकर्षित करण्यासाठी ज्वारीसारख्या सापळा पिकाच्या २-३ ओळी सगळ्या बाजुंनी लावा.
  • शेताचे नियमित निरीक्षण करुन प्रादुर्भावग्रस्त झाडांचे भाग काढुन टाका.
  • नत्राची पुरेशी पातळी आणि वेळशीर वापराची काळजी घ्या.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण नियंत्रण करा.
  • चांगले पाणी व्यवस्थापन करा.
  • पीक घेतल्यानंतर झाडांचे अवशेष काढुननष्ट करा.
  • यजमान नसणार्‍या पीकांबरोबर दीर्घकालीन पीक फेरपालट योजना करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा