Cosmopolites sordidus
किडा
फिकट हिरवी, मरगळलेली आणि वाळलेली पाने हे संक्रमित केळीच्या झाडावरील पहिले लक्षण आहेत. उपद्रवाचे छिद्र किंवा विष्ठा पहिल्यांदा जुन्या पर्णकोषांवर किंवा खोडाच्या खालच्या भागात दिसते. अळ्या खोड आणि मुळात आणि काही वेळेस संपूर्ण झाडात खालपासुन वरपर्यंत बोगदे करतात. गंभीर संक्रमण झालेले भाग बुरशीमुळे कुजतात ज्यामुळे काळी रंगहीनता दिसुन येते. संधीसाधु जंतुंनी खाल्ल्याने आणि घर केल्याने पाणी आणि पोषकांचे वहन बाधीत होते ज्यामुळे पाने वाळतात आणि अकाली मर होते. कोवळी रोपे नीट विकसित होत नाहीत आणि जुन्या पानांची वाढ खुंटते. गंभीर संक्रमणात, संक्रमित झाडे विपरीत हवामान परिस्थितीत कोलमडतात. घड आकाराने आणि संख्येने खूप कमी येतात.
पूर्वी असंख्य भक्षकांचा वापर कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी माफक यशाने केला गेला आहे, काही प्रजातीच्या मुंग्या आणि भुंगे हे त्यापैकीच एक आहेत. या भक्षकातील प्लेसियस जावानुस आणि डॅक्टिलोस्टेरनस हायड्रोफिलॉइडस भुंगे सर्वात यशस्वी आहे. लागवड करण्याआधी मुनव्यांवर गरम पाण्याचे (४३ डिग्री सेल्शियस तापमान ३ तासांसाठी किंवा ५४ डिग्री सेल्शीयसचे तापमान २० मिनिटांसाठी) केल्यासही परिणाम देते. उपचार केल्यानंतर नविन शेतात मुनव्याना शक्य तिथक्या लवकर लागवड करा. लागवडीपूर्वी मुनव्याना २०% निंबोळी अर्क द्रावणात (अॅजाडिरेक्टा इन्डिका) बुडवून लागवड केले असता या किडीविरुद्द कोवळ्या रोपांचे संरक्षण होते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. झाडाच्या बुडाजवळ कीटकनाशकांचा वापर करुन सोंडअळीच्या संख्येवर नियंत्रण केले जाऊ शकते. ऑर्गॅनोफॉस्फेटस (क्लोरपायरीफॉस, मॅलेथियॉन) गटातील कीटकनाशकेही उपलब्ध आहेत पण ती महाग असुन वापरणार्यासाठी तसेच पर्यावरणासही विषारी होऊ शकतात.
कॉस्मोपोलिटेस सॉर्डियस किडे आणि त्यांच्या अळ्यांमुळे पिकाचे नुकसान होते. प्रौढ गडद तपकिरी ते राखाडी काळे असुन त्यांवर चकचकीत कवच असते. ते बहुधा झाडाच्या बुडाजवळ सापडतात कारण ते झाडाच्या अवशेषात किंवा पर्णकोषात रहातात. ते निशाचर असुन न खाताही खूप महिने जगु शकतात. माद्या पांढरी अंडाकृत अंडी जमिनीतील झाडाच्या अवशेषातील छिद्रात किंवा पर्णकोषात लपवुन घालतात. तापमान १२ डिग्री सेल्शियसच्या खाली असेल तर अंड्याचा विकास होत नाही. बारीक अळ्या ऊबुन बाहेर आल्याबरोबर मुळात किंवा खोडांच्या पेशीत बोगदे करु लागतात, ज्यामुळे झाड कमजोर होतात आणि काही वेळा कोलमडतात. संधीसाधु जंतु सोंडअळीने केलेल्या छिद्रातुन आत शिरुन झाडास संक्रमित करतात. एका शेतातुन दुसर्या शेतात या रोगाचा प्रसार संक्रमित लागवड सामग्रीच्या वहनाने होते.