केळी

केळीच्या खोडावरील सोंडकीड

Odoiporus longicollis

किडा

थोडक्यात

  • पर्णकोषाच्या बुडाजवळ किंवा कोवळ्या रोपांच्या खोडावर बारीक छिद्र आणि सोडलेला चिकट घट्ट विष्ठा दिसते.
  • अळ्या खोडातुन आरपार बोगदे करतात आणि भरपूर विष्ठा सोडतात.
  • पाने पिवळी होतात आणि झाडाची वाढ खुंटलेली असते.
  • खोड कमजोर झाल्यामुळे तुटते आणि जोरदार हवेमुळे कोलमडते.
  • घड किंवा फळे व्यवस्थित विकसित होत नाहीत.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

पर्णकोषाच्या बुडाजवळ किंवा कोवळ्या रोपाच्या खोडावर बारीक छिद्र आणि सोडलेली चिकट विष्ठा दिसणे ही संक्रमणाची पहिली लक्षणे आहेत. अळ्यांची तपकिरीसर विष्ठासुद्धा छिद्रांच्या आजुबाजुला दिसते. अळ्या खोडातुन आरपार बोगदे करतात ज्यामुळे गंभीर नुकसान होते आणि पाणी तसेच पोषक तत्वे झाडाच्या भागात पोचत नाहीत. पाने पिवळी पडतात आणि झाडाची वाढ खुंटते. गंभीर संक्रमण झाले असता खोड कमजोर झाल्यामुळे तुटते आणि जोरदार हवेत किंवा वादळामुळे कोलमडते. झाडाचे विविध भाग झपाट्याने रंगहीन होतात आणि संधीसाधु बुरशी जखमांमध्ये शिरल्याने घाणेरडा वास सुटतो. संक्रमित झाडावर किड्यांच्या जीवनचक्रातील सर्व टप्पे, पूर्ण वर्षभर उपस्थित असतात. घड किंवा फळे व्यवस्थित विकसित होत नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पूर्वी स्टेनेर्नेमा कार्पोकॅप्से प्रजातीची सुत्रकृमी किंवा आर्थोपॉडसच्या काही प्रजातीच्या जंतांना सोंडकिड्यांविरुद्ध वापरुन थोडे यश मिळाले आहे. दुसरी पद्धत म्हणजे सोंड किड्यांना बुरशीच्या जंतुंनी उदा. मेटार्हिदझियम अॅनिसप्लेने संक्रमित करणे होय.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ऑर्गॅनोफॉस्फरस मिश्रणे असणारी कीटकनाशके खोडात इंजेक्शनद्वारे सोडून अळ्यांना मारले जाऊ शकते. पीक काढणीनंतर, संक्रमित खोड काढुन त्यांवर कीटनाशकांचे (२ ग्रॅम/ली.) उपचार किड्यांच्या उरलेल्या अंड्यांना मारण्यासाठी करावेत.

कशामुळे झाले

प्रौढ किडे काळ्या रंगाचे, सुमारे ३० मि.मी. लांबीचे असतात आणि त्यांचे डोके टोकदार असुन शरीरावर चमकदार कवच असते. ते मुख्यतः निशाचर असतात पण थंडीत आणि ढगाळ वातावरणात दिवसाच्या वेळीसुद्धा पाहिले जातात. केळीच्या झाडातुन उत्पन्न होणार्यान वासाने ते आकर्षिले जातात. माद्या पर्णकोषात चीर करुन आत फिकट पांढरी, लंबवर्तुळाकार अंडी घालतात. ५-८ दिवसात, गुबगुबीत, पाय नसलेले, पिवळसर पांढर्‍या अळ्या ऊबुन बाहेर येतात आणि पर्णकोषाच्या कोवळ्या भागास खाण्यास सुरवात करतात. त्या मोठे पसरलेले सुमार ८ ते १० सें.मी. लांबीचे, खोड, मूळ किंवा घड येणार्‍या फ़ांदीपर्यंत पोचणारे बोगदे तयार करतात. प्रौढ चांगले उडु शकतात आणि सहजपणे एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर उडतात आणि प्रादुर्भाव करतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन निरोगी लागवड सामग्री घ्या.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • प्रौढांचे प्रजनन स्थाने असलेले झाडाचे अवशेष तसेच तुटलेली आणि कुजणारी झाडे काढुन जाळुन टाका.
  • आडवी चिरलेली खोड जमिनीवर किड्यांचा सापळा म्हणुन अंथरा.
  • हे कापलेले भाग प्रौढ मादीला खाद्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी आकर्षित करतात.
  • अळ्या बाहेर येण्याच्या अवस्थेत हे तुकडे कोरडे पडतात आणि अखेरीस पाण्याच्या कमतरतेमुळे अळ्या मरतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा