Stenodiplosis sorghicola
किडा
अळ्या कणसात वाढणारे दाणे खातात, ज्यामुळे वाढ खुंटते व दाणे आक्रसतात, विकृत आकाराचे किंवा पोकळ होतात. तयार पीकात प्रादुर्भावग्रस्त कणसे भाजल्यासारखी किंवा फुटल्यासारखी दिसतात. कणसातील फुलोरा पोकळ किंवा पातळ येत असून त्यांच्या टोकावर मिजमाशीचे कोष आढळतात. जर कणसे पिळली तर लाल द्रव निघतो, जो मिज माशीच्या चिरडलेल्या अळ्या किंवा कोषांचा असतो. गंभीर प्रदुर्भावात दाणे न भरता संपूर्ण कणीस पोकळ होते.
युपेलमस, युपेलमिडे, टेट्रास्टिचस आणि अॅप्रोस्टोसेटस (अॅप्रोस्टोसेटस डिप्लोसिडिस, अॅप्रोस्टोसेटस कोइम्हाटोरेनसिस, अॅप्रोस्टोसेटस गाला) जातीचे बारीक काळे परजीवी वॅस्पस या अळ्यांना खातात आणि त्यांची संख्या कमी करण्यासाठी शेतात सोडले जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शेतात मिजचे रसायनिक नियंत्रण कठिण आहे कारण अळ्या, कोष आणि अंडी ही कणसातील फुलोऱ्याच्या आत सुरक्षित असतात. कीटनाशकांचा वापर योग्य वेळी म्हणजे फुलोऱ्याच्या अवस्थेत सकाळच्या वेळी जेव्हा प्रौढ कोषातुन बाहेर येतात तेव्हाच केला गेला पाहिजे. इतर परिस्थितीत, उपचार परिणाम देत नाहीत. क्लोरपायरिफॉस, सायफ्ल्युथ्रिन, सायथॅलोथ्रिन, एसफेनव्हॅलरेट, मॅलॅथियॉन किंवा मिथोमिल असणार्या मिश्रणांचा वापर केला जाऊ शकतो. कापणी केल्यानंतर, ज्वारीच्या दाण्यांना फॉस्फाइनची धुरी दिल्यास उपद्रव नविन भागात पसरण्याचा धोकाही कमी होतो.
स्टेनोडिप्लोसिस सॉरघिकोला नावाच्या ज्वारीवरील मिज माशीच्या अळ्यांमुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ मिज डासासारखे दिसतात व त्यांचे शरीर नारिंगी रंगाचे आणि पंख पारदर्शक असुन त्यांना लांब मिशा असतात. जेव्हा तापमान आणि आर्द्रता वाढते तेव्हा ते सु्प्तावस्थेतुन दाण्यात बाहेर येऊन एका तासाच्या आत संभोग करतात. माद्या काही काळानंतर १-५ बारीक, दंडगोलाकार आणि पारदर्शक अंडी प्रत्येक फुलोऱ्यावर घालतात. अंडी २-३ दिवसात उबून बारीक, रंगहीन अळ्या कोवळ्या दाण्यांना खाऊ लागतात. १०-१५ दिवसाच्या सतत खाण्यानंतर, मोठी गडद नारिंगी रंगाची अळी दाण्यात ३-५ दिवसांसाठी कोषात जाते आणि प्रौढ म्हणुन बाहेर येते आणि जीवनचक्र पुन्हा सुरु होते. पीक काढल्यानंतर ज्या अळ्या अजुनही दाण्यात असतात त्या सुप्तावस्थेत जातात जिथे त्या ३ वर्षांपर्यंत राहू शकतात.