Chilo partellus
किडा
ठिपकेदार खोडकिड्यांचे छोटे सुरवंट रोपाच्या कोवळ्या भागांना खातात. ते पानांमध्ये आणि पानाभोवतालच्या देठांत बोगदे करतात ज्यामुळे ओबड धोबड आकाराचे व्रण, छिद्रे आणि खिडक्या तयार होतात. प्रौढ अळ्या फांद्यांत बोगदे करुन त्यांतील भाग खातात ज्यामुळे पाणी आणि पोषकांचे वहन नीट होत नाही. जिथे फांद्या पोकळ झाल्यात आणि आत फक्त सुरवंट आणि त्यांची विष्ठा दिसते तिथे ह्या खाण्यामुळे "गाभा सुकण्याची" लक्षणे दिसतात. रोपाच्या वरचा भाग थोडा किंवा पूर्ण सुकतो. लवकर लागण झालेल्या रोपांची वाढ खुंटते आणि ती जमिनदोस्त होऊ शकतात. प्रौढ सुरवंट कणसातही खूप बोगदे करतात. एकुण ह्या खाण्यातील वाढीमुळे बुरशी किंवा जंतुच्या संसर्गांच्या घटना जास्त होतात.
कोटेशिया सिसेमायी कोटेशिया फ्लाविप्स आणि ट्रिकोग्रामा चिलोनिस नावांचे परजीवी वॅस्पस ठिपकेदार खोडकिड्यांच्या अळ्यांवर अंडी घालतात. झॅन्थोपिम्ला स्टेम्मॅटर नावाचा दुसरा वॅस्प ह्या किड्यांच्या कोषांवर हल्ला करतो. नैसर्गिक शिकार्यांत आहेत इयरविग्ज आणि मुंग्या. त्यांच्यामुळे ह्या किड्यांची संख्या नियंत्रणात येते. शेवटी काकवीचा वास येणारे गवत (मेलिनिस मायन्युटिफ्लोरा) किंवा हिरव्या पानांचे डेस्मॉडियम (डेस्मॉडिम इनटॉर्टम) वास सोडतात जे ह्या पतंगांना पळवुन लावतात. बॅसिलस थुरिंगिनेसिस, नीम तेलाचा अर्क किंवा ब्युव्हेरिया बॅसिआनावर आधारीत तयार केलेली द्रावणेही ह्या किड्यांचे नियंत्रण करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटनाशकांच्या उपचाराच्या परिणामांचा पिकाच्या होणार्या नाशाशी आणि त्या भागातील जैव विविधतेच्या होणार्या नुकसानाशी तुलनात्मक रीतीने विचार केला पाहिजे. डेल्टामेथ्रिन किंवा क्लोरँट्रिनिलिप्रोलवर आधारीत कीटनाशके कणांच्या रुपात जर थेट बोगद्यात वापरली तर ज्वारीवरील ठिपकेदार खोडकिड्यांचे नियंत्रण होते असे दिसुन आले आहे.
प्रौढ पतंग फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांचे पंख २० ते २५ मि.मी. लांब असतात. पुढचे पंख फिकट तपकिरी असुन त्यावर काही गडद पॅटर्न असतात तर पाठचे पंख सफेद असतात. प्रौढ रात्रीच्या वेळी कार्यशील असतात आणि रोपांत आणि रोपाच्या कचर्यात दिवसाला विश्रांती घेतात. माद्या दुधाळ सफेद रंगाची अंडी १०-८०च्या पुंजक्यांनी पानांच्या पृष्ठभागावर घालतात. सुरवंटांचे डोके लालसर तपकिरी असते आणि शरीर फिकट तपकिरी असते ज्यावर लांब उभे गडद पट्टे आणि गडद ठिपके पाठीवर दिसतात, म्हणुन ठिपकेदार खोडकिडा हे नाव आहे. यजमान रोपेही खूप आहेत ज्यात येतात ज्वारी, बाजरी आणि मका. हवामान पतंगाच्या जीवनावर खूपच परिणाम करते. उबदार आणि सापेक्ष आद्र हवामान त्यांना अनुकूल असते. किडे बहुधा गरम सखल प्रदेशात सापडतात आणि क्वचितच १५०० मी. पेक्षा उंचीवरील प्रदेशात सापडतात.