लेट्यूस

चमकदार रेषा व तपकिरी डोळे असणारा पतंग

Lacanobia oleracea

किडा

थोडक्यात

  • पाने, फांद्या आणि फळे खाल्याने (छिद्रे, भोके, वरवर खरचटणे) नुकसान होते.
  • नुकसानीत भाग आणि विष्ठेवर संधीसाधु जंतु घर करतात ज्यामुळे कूज होते.
  • सुरवंटांवर पांढरे आणि काळे ठिपके असुन त्यांच्या बगलेत पिवळे पट्टे असतात.
  • फिकट तपकिरी पतंगांवर पांढर्‍या नागमोडी रेषा आणि दोन लालसर ठिपके प्रत्येक पंखावर असतात.

मध्ये देखील मिळू शकते

6 पिके
कोबी
बेदाणा
लेट्यूस
वाटाणा
अधिक

लेट्यूस

लक्षणे

कोवळी पाने, खोड, फुले आणि फळांवर चावल्याच्या खुणा दिसतात. छोट्या अळ्या पानांच्या खालच्या बाजुला छोटी छिद्रे करुन खातात. जशा त्या मोठ्या होतात, पूर्ण पानाचे, खोडाचे आणि फळ तसेच फुलांचेही गंभीर नुकसान करतात. फळांच्या पृष्ठभागावर छिद्रांच्या शृ़खला, बोगदे आणि वरवरचे खरचटणे दिसते. नुकसानीत भागात आणि विष्ठेवर संधीसाधु जंतु घर करतात ज्यामुळे कूज होते. म्हणुन एका मोठ्या अळीचे जरी संक्रमण झाले तर ते पिकाला हानीकारक असते. त्यांचे यजमानही भरपूर आहेत ज्यात येतात, टोमॅटो, मिरी, बटाटे, लेट्युस, काकडी, कांदे, कोबी आणि फुलकोबी.

शिफारशी

जैविक नियंत्रण

काही बाबतीत, ट्रायकोग्रामा परजीवी वॅस्पसमुळे (टी. इव्हानेसेन्स) किंवा शिकारी किडे पोडिसस म्याक्युलिव्हेन्ट्रिसच्या वापराने सुरवंटांची संख्या कमी होते. स्पिनोसॅड किंवा बॅसिलस थुरिजिएनसिस (बीटी) असणार्‍या कीटनाशकांचा वापर करा जे पर्यावरणात रहात नाहीत. ह्याचे ०.१% केंद्रीकरणाचा वापर अळ्या दिसताक्षणीच आणि नंतर दोनदा परत फवारल्यास ह्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी रसायनांच्या ऐवजी चांगला पर्याय आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या पतंगाच्या बाबतीत, स्पिनोसॅड आणि बीटीसारख्या पर्यायी उत्पादांची परिणामकारकता रसायनीक उपचारांचे समर्थन करीत नाही. नाही तर अल्फासायपरमेथ्रिन, बीटाचयफ्ल्युथ्रिन, बायफेनथ्रिन, सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, डायफ्ल्युबेनझुरॉन, फेनप्रोपेथ्रिन, लँब्डासायहॅलोथिन, टेफ्ल्युबेन्झुरॉनवर आधारीत उत्पादांचा वापर केला जाऊ शकतो. कीटनाशकांचा समावेश चांगल्या एकीकृत व्यवस्थापनातुन केल्यास मित्र किडींवरील विपरित परिणाम टाळता येऊ शकतो.

कशामुळे झाले

लाकानोबिया ओलेराशिया नावाच्या ब्राइट लाईन तपकिरी डोळ्यांच्या पतंगांच्या सुरवंटांमुळे नुकसान होते. पतंगांना आर्द्र आणि पोषणाने भरपूर असलेल्या जागा आवडतात, हरितगृहे, शेत, नदीचा काठ किंवा वनातील अशा त्यांच्या बर्‍याच वस्त्यांची ठिकाणे असतात. प्रौढ पतंगांचे पंख सुमारे ३५-४५ मि.मी. असतात आणि शरीर फिकट तपकिरी रंगाचे असुन काही प्रजाती थोड्या गडदही असतात. पुढचे पंख गडद लालसर तपकिरी असुन मूत्रपिंडच्या आकाराचे फिकट नारिंगी डाग ठळकपणे दिसतात. कडांवर नागमोडी (W सारखी) पांढरी चमकदार रेषा दिसणे हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. पाठचे पंख राखाडी आणि कडेकडे गडद असतात. माद्या १५० च्या गटाने पुंजक्याने घालतात आणि त्यांना यजमान रोपाच्या पानाच्या खालच्या बाजुला ठेवतात. सुरवंट ५ सें.मी. पर्यंत वाढतात आणि त्यांचा रंग हिरवा ते गडद तपकिरीपर्यंत असतो ज्यावर पांढरे आणि काळे ठिपके आणि बगलेत पिवळे पट्टे असतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या शेताचे निरीक्षण करुन अंडी, रोपांचे प्रभावित भाग किंवा सुरवंट काढुन टाका.
  • जाळी वापरुन पतंगांचा हरितगृहातील प्रवेश बंद करा.
  • पानांच्या खालच्या बाजुने अंड्यांचे पुंजके आणि सुरवंट काढुन टाका.
  • संक्रमित रोपे काढुन नष्ट करा.
  • पीक घेतल्यानंतर जमिनीचे निरीक्षण करुन उरलेले कोष काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा