Mamestra brassicae
किडा
कोबीवरील सुरवंट पाने खातात व कोबीच्या गड्ड्यात बोगदे तयार करतात. ते फक्त पानांचा पातळ भाग खातात व जाड शिरांचा भाग टाळतात, त्यामुळे पानांमध्ये फक्त शिराच शिल्लक राहतात. पहिल्या पिढीच्या तुलनेत (वसंत ऋतु ते उन्हाळ्याच्या सुरवातीपर्यंत), दुसरी पिढी जास्त जोमदार असते (उन्हाळ्याच्या शेवट पासुन ते ऑक्टोबरपर्यंत) व जाडसर भागही खाऊ शकते. ते फक्त पानच खात नसुन कोबीच्या आतल्या जाड भागातही बोगदे तयार करतात. आत शिरण्याच्या छिद्रांजवळ आणि बोगद्यात विष्ठेचे कण दिसतात. ह्यामुळेच पीकाचे भारी नुकसान होते. ह्यामुळे कोबीरील पतंगांचे सुरवंट पिकास भारी नुकसानदायक ठरतात.
ट्रिकोग्रामा प्रजातीचे परजीवी वॅस्पस ह्या पतंगांची अंडी नष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. ह्यांच्या शिकार्यांची खूप मोठी शृंखला आहे व त्यात शिकारी बीटल्स, यलो जॅकेट्स, हिरवे लेसविंग, कोळी, आणि पक्षीही सामील आहेत जे ह्या अळ्यांना खातात. नैसर्गिकरीत्या सापडणाऱ्या विषाणूंवर आधारीत उत्पाद जसे कि बॅसिलस थुरिंजिएनसिस आणि इतर विषाणू मिश्रणे सुरवंटांना मारतात आणि पानांच्या दोन्ही बाजुंना व्यवस्थित फवारल्यास अतिशय चांगला परिणाम देतात. ही कीटनाशके वातावरणात रहात नाहीत. ओल्या वातावरणात उदा. थंड ढगाळ हवेत, ह्या सुरवंटांविरुद्ध काही सुत्रकृमी सुद्धा चांगले काम करु शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पायरेथ्रम, लाम्बडासायहॅलोथ्रिन, सायहॅलोथ्रिन किंवा डेल्टामेथ्रिनवर अधारीत सक्रिय घटक असलेले उत्पाद ह्या पतंगांच्या सुरवंटांसाठी वापरले जाऊ शकतात. पायरेथ्रमच्या अर्काचा वापर काढणीच्या एक दिवस आधीपर्यंत बरेचदा करता येऊ शकतो. लाम्बडासायहॅलोथ्रिन आणि डेल्टामेथ्रिनचा वापर फक्त दोन वेळा करता येऊ शकतो व ह्यांचा वापर काढणीच्या सात दिवस आधीपर्यंतच करण्याची शिफारस केली गेली आहे.
कोबीवरील पतंगांच्या सुरवंटांमुळे (मॅमेस्ट्रा ब्रासिके) ही लक्षणे येतात. मोठ्या अळ्या जमिनीत जाऊन आपली कोषावस्था घालवतात. प्रौढांच्या पुढचे पंख काळसर तपकिरी असून त्यामध्ये काळसर तपकिरी चट्टे व पारदर्शक भाग आलटुन पालटुन असतात. पाठचे पंख फिकट राखाडी असतात. कोषातुन बाहेर आल्यानंतर माद्या पांढर्या रंगाची गोलाकार अंडी पुंजक्याने पानांच्या दोन्ही बाजूंवर घालतात. उबल्यानंतर त्यातुन सुरवंट बाहेर येतात आणि पाने खायला सुरवात करतात व अखेरीस कोबीच्या कडक भागातही बोगदे तयार करतात. ते पिवळसर हिरव्या रंगाचे किंवा तपकिरीसर हिरवे असतात आणि त्यांच्या शरीरावर केस नसतात. कोबीचे पतंग वर्षातुन दोन पिढ्या तयार करतात. वसंत ऋतुच्या शेवटी पहिली पिढी जमिनीतुन उबुन बाहेर पडते आणि सुरवंट संक्रमित झाडांवर दिसु लागतात. उन्हाळ्याच्या शेवटी दुसरी पिढी दिसते.