इतर

कांद्यावरील अपाद अळ्या

Delia platura

किडा

थोडक्यात

  • अळ्या अंकुरणार्‍या कोंबांना आणि बियांना खातात, वाढणार्‍या भागांचे नुकसान करतात.
  • कोवळ्या पानांवर अळ्यांनी खाल्ल्याने झालेले नुकसान स्पष्ट दिसते.
  • अंकुरणारी रोपे सुकलेली, खुजी, विकृत आकाराची आणि कमी उत्पन्न असणारी असतात.
  • ओल्या जमिनी आणि लांबलेली थंडी तसेच उच्च आर्द्र हवामान ह्या उपद्रवास अनुकूल आहेत.

मध्ये देखील मिळू शकते

6 पिके
द्वीदल धान्य
कोबी
लसुण
लेट्यूस
अधिक

इतर

लक्षणे

अळ्या जमिनीतील सेंद्रिय बाबी आणि अंकुरणार्‍या रोपांना खातात. ते बियाणांत पोखरतात, त्यामुळे वाढणारे भाग नाश पावतात आणि अंकुरणे होत नाही. जरी ती रोपे अंकुरली तरी अळ्यांनी खाल्ल्याचे स्पष्ट लक्षण कोवळ्या पानांवर दिसते. नंतर भाग सडु लागतात. कोवळी रोपे सुकतात, खुजी होतात, विकृत होतात आणि रोपाला फारच कमी आणि कमी प्रतीच्या बिया लागतात ज्यामुळे उत्पन्नाचे नुकसान होते. जर जमिनी ओल्या असतील आणि फार लांबलेल्या काळापर्यंत थंड हवा आणि उच्च आर्द्रता राहीली तर फारच मोठे नुकसान होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्यांच्या जमिनीखालील आयुष्यामुळे, मक्याच्या बियाणांवरील अळ्यांचे नैसर्गिक शत्रु फार कमी आहेत. तरीपण जमिनीतील बीटल्स, कोळी आणि पक्षी प्रौढांची शिकार करतात. अळ्यांवर बुरशीच्या रोगांचा प्रभाव पडतो. तरीपण शिकारी तसेच बुरशीचे रोग मिळुनही पुरेसे नियंत्रण पुरवित नाहीत. माशा नैसर्गिकपण चकचकीत रंगांकडे आकर्षित होतात, म्हणुन त्यांना चकचकीत बादल्यात साबणाचे पाणी घालुन अडकविता येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अळ्यांना पळवुन लावण्यासाठी बियाणांवर कीटनाशकाचे उपचार केले जाऊ शकतात. कीटनाशकांचा वापर केला जाऊ शकतो पण आपल्या देशातील नियमांबाबत जागरुक रहा. जमिनीत देण्यात येणार्‍या कीटनाशकांचाही वापर केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

डेलिया प्लाटुरा आणि डि. अँटिका नावाच्या माशांच्या अळ्यांमुळे ही लक्षणे उद्भवतात. प्रौढ रंगाने घरातील माशीसारखेच दिसतात पण ते छोटे आणि सडपातळ असतात. जुन्या मुळांच्या आजुबाजुला जमिनीत आणि रोपांच्या अवशेषात ते विश्रांती घेतात. वसंतात पेरणी होण्याइतक्या लवकर प्रौढ अवतरतात. शेणखत किंवा भरपूर प्रमाणात सडणारी सामग्री असणार्‍या जमिनीत माद्या अंडी घालतात. पिवळसर पांढर्‍या, बिनपायांच्या अळ्या सुमारे एक अठवड्याने ऊबुन बाहेर येतात आणि कुजणारे पदार्थ तसेच अंकुरणार्‍या रोपांना खाऊ लागतात. उपद्रवाच्या जीवनचक्राला आणि खाण्याच्या क्रियेसाठी अनुकूल असलेल्या थंड, ओल्या हवामानात नुकसान खूप जास्त होते. ऊबदार आणि उन्हे असणारे हवामान अंडी घालण्यात कमी आणते आणि रोपेही वेगाने आणि जोमाने वाढतात.


प्रतिबंधक उपाय

  • कमी सेंद्रिय बाबी असलेल्या कोरड्या जमिनीत पेरणी करा.
  • ऊबदार आणि उन्हे असण्याच्या काळात उथळ पेरणी करा.
  • जर शेणखत वापरायचे असेल तर पेरणी करण्यासाठी काही अठवडे थांबा.
  • गवतांसारखी कव्हर पिके लावा.
  • बियाणांना इजा होऊ नये म्हणुन काळजीपूर्वक हाताळा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण काढुन टाका.
  • आपल्या रोपवाटिकेत बारीक जाळी लावुन अळ्यांना माशांना दूर ठेवा.
  • नांगरुन रोपांच्या अवशेषांना जमिनीत खोल पुरुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा