द्वीदल धान्य

नागअळी

Agromyzidae

किडा

थोडक्यात

  • शिरांनी सीमित असणार्‍या ओबड धोबड सर्पाकृती (नागमोडी) राखाडी रेषा दिसतात.
  • पाने अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

जेव्हा अळ्या खातात तेव्हा ओबड धोबड किंवा सर्पाकृती (नागमोडी) फिकट राखाडी रेघा पानांच्या दोन्ही बाजुने दिसतात. हे बोगदे फक्त पानांच्या शिरांपर्यंतच जातात आणि त्यांची काळी विष्ठा बारीक रेषेप्रमाणे त्या बोगद्यात दिसते. पूर्णपानभर बोगदे केलेले असतात. नुकसानीत पाने अकाली गळतात (पानगळ). पानगळीमुळे उत्पन्न आणि फळांचा आकार कमी होतो आणि फळे उन्हाने करपतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

संक्रमण छोट्या प्रमाणात झाले असता फक्त वरवर ठिपके दिसतात आणि उत्पादनावर परिणाम होत नाही. परजीवी वॅस्पस जे नागअळीला मारतात ते बाजारात उपलब्ध आहेत. लेडीबर्डस नागअळीच्या माशांचे शिकारी आहेत. मोठे नुकसान टाळण्यासाठी, नीम तेल, निंबोळीचा अर्क (एनएसकेइ ५%), नीम तेल (१५०००पीपीएम) ला ५मि.ली./ली च्या दराने किंवा स्पिनोसॅड प्रौढांना खाण्यापासुन परावृत्त करते आणि अंडी कमी घातली जातात ज्यामुळे नुकसान कमी होते. ह्या उत्पादांमुळे नैसर्गिक शत्रुंवर आणि परागीकरण करविणार्‍या किड्यांवर कमी प्रभाव पडतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ऑर्गॅनोफॉस्फेटस, कार्बामेटस आणि पायरेथ्रॉइड कुटुंबातील विस्तृत श्रेणीच्या कीटनाशकांमुळे प्रौढ अंडी घालणे टळतात पण ह्या औषधांमुळे अळ्यांचा नायनाट होऊ शकत नाही.अ आणि म्हणजे ह्यामुळे नैसर्गिक शत्रुही कमी होतात आणि माशांमध्ये ह्याचा प्रतिकार निर्माण होतो, ज्यामुळे काही वेळा त्यांची संख्याही वाढते. अॅबा मेक्टिन, क्लोरँट्रानिलोप्रोल, अॅसेटामिप्रिड, स्पिनेटोराम किंवा स्पिनोसॅड सारखे उत्पाद प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन आलटुन पालटुन वापरावे.

कशामुळे झाले

नागअळी अॅग्रोमायझिडे माशांच्या जातीतील असुन त्यांच्या हजारोंनी प्रजाती जगभरात पसरलेल्या आहेत. वसंतात माद्या पानाच्या खालच्या बाजुला टोचुन बहुधा कडांच्या बाजुने अंडी घालतात. अळ्या पानांच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागाच्या मधला भाग खातात. ते मोठे पांढरे वळणावळणाचे बोगदे तयार करतात आणि त्यात त्यांची काळी विष्ठा पाठी सोडत जातात. एकदा का अळ्या वयात आल्या कि मग त्या पानांखाली भोक करुन जमिनीवर पडतात आणि कोषात जातात. यजमान झाडांच्याजवळ पडलेला रोपांचा कचरा हे त्यांचे कोषात जाण्याचे पर्यायी स्थान आहे . पानांत बोगदे करणार्‍या माशा पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात.


प्रतिबंधक उपाय

  • नागअळीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असलेली रोपे वापरा.
  • मुडपलेल्या पानांचे वाण निवडा जे ह्या उपद्रवास कमी संवेदनशील असेल.
  • संक्रमित शेताजवळ पर्यायी यजमानांची पिके लावु नका.
  • पानाच्या खालच्या बाजुला किड्यांच्या लक्षणासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • पिवळे, चिकट सापळे लाऊन नागअळीची उपस्थिती तपासा.
  • चिकट सापळे वापरण्याच्या पद्धतीने उपद्रवास दडपले जाऊ शकते.
  • प्रति १०० रोपात जर ८-१२ रोपे संक्रमित झाली असतील तर तिथे नियंत्रण उपायांची गरज असते.
  • प्रादुर्भाव झालेली पाने किंवा जास्त संक्रमित रोपे हाताने काढुन नष्ट करा.
  • माशा स्थलांतर करुन न येण्यासाठी शेताच्या कडेने फुलांची झाडे लावा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण आणि स्वयंभू पिका काढुन टाका.
  • माशांनी जमिनीत प्रजोत्पादन करु नये ह्याकरीता जमिनीवर आच्छादन करा.
  • मित्र किड्यांवर परिणाम होईल अशा सर्वसाधारण कीटनाशकांचा उपयोग करु नका.
  • खोल नांगरणी करा म्हणजे नागअळी उघडी पडेल व त्यांचे नैसर्गिक शत्रु त्यांना खातील.
  • किंवा काढणीनंतर संक्रमित झाडांचे भाग काढुन जाळुन टाका.
  • पिकांचे फेरपालट यजमान नसलेल्या पीकासोबत करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा