भेंडी

फ्ली बीटल (तुडतुडा बीटल)

Chrysomelidae

किडा

थोडक्यात

  • पानांवर खाल्याने नुकसान दिसते.
  • बंदुकीच्या गोळीसारखी छोटी छिद्रे दिसतात.
  • खाल्याजागी थोडी पिवळी किनार दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

25 पिके

भेंडी

लक्षणे

प्रौढ पाने खातात. पानांवर छोट्या विखुरलेल्या बंदुकीच्या गोळीच्या छिद्रांसारखी छिद्रे (१-२ मि. मी.) आणि पानाच्या कडेने चावल्यामुळे आरपार नसलेले खड्डे दिसतात. प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या आजुबाजुला थोडा पिवळेपणा येऊ शकतो. कोणती प्रजाती आहे ह्याप्रमाणे कंद पिकांमध्ये वेगवेगळ्या खोलीचे अरुंद, सरळ बोगदे दिसतात. या नुकसानीचे लक्षण म्हणुन कंदाच्या पृष्ठभागावर लहान उंचवटे देखील दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

लेसविंगच्या अळ्या (क्रायसोपा प्रजाती), डॅमसेल बग्जचे प्रौढ (नाबिस प्रजाती) आणि काही परजीवी वॅस्पस प्रौढ फ्ली बीटल्सना फस्त करतात. काही सूत्रकृमी सुद्धा जमिनीत रहाणार्‍या त्यांच्या अळ्यांवर नियंत्रण ठेवतात. त्यांची संख्या कमी करण्यासाठी काही बुरशी, कीटनाशक साबण किंवा स्पिनोसॅड सारखी जिवाणूजन्य कीटनाशके वापरले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटनाशकाचा उपयोग बीटल्सच्या संवेदनशील काळात म्हणजे ज्या वेळी ते पानावर दिसतात अशा वेळी केला गेला पाहिजे. क्लोरपायरीफॉस आणि मॅलेथियॉनवर आधारीत उत्पाद त्यांच्या संख्येवर चांगले नियंत्रण ठेवतील.

कशामुळे झाले

विविध पिकांवर फ्ली बीटलच्या पुष्कळ प्रजाती परिणाम करतात. बहुतेक प्रौढ लहान आकाराचे (साधारणपणे ४ मि.मी.), गडद रंगाचे, काहीवेळा चमकणारे किंवा चकचकीत असतात. शरीर लंबगोलाकार असून त्यांचे मागचे पाय उड्या मारण्यासाठी लांब असतात. अळ्या जमिनीत रहातात आणि मुळे किंवा कंदांना खातात तर प्रौढ नविन रोपे खातात. बहुतेक फ्ली बीटल झाडांच्या अवशेषात, जमिनीत किंवा शेताच्या आजुबाजुच्या तणात विश्रांती घेतात. ते वसंत ऋतुमध्ये कार्यरत होतात. प्रजाती कोणती आहे आणि हवामान कसे आहे याप्रमाणे वर्षात १ ते ४ पिढ्या होतात. फ्ली बीटल्सना उबदार, कोरडे हवामान चांगले मानवते.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीची वेळ (लवकर किंवा उशीरा) साधा म्हणजे प्रौढांच्या कार्यरत होण्याची वेळ टाळता येईल.
  • फ्ली बीटलला आकर्षित करणारे सापळा पीक लावा.
  • ह्या किड्यांना पळवुन लावणारी किंवा थांबविणारी यजमान नसणारी पीके लावा.
  • जैविक आच्छादने घातल्यास अंडी घालण्यात आणि अळ्याच्या टप्प्यावर अडथळा निर्माण होतो.
  • खासकरून वसंत ऋतुमध्ये आपल्या झाडांवर नियमितपणे लक्ष ठेवा.झाडांना आवश्यक ती पोषके संतुलित खतांच्या रुपात द्या.
  • पाणी नियमित द्या आणि विवेकाने द्या.
  • शेतातुन तण स्वयंभू रोपांचे नियंत्रण चोखपणे करा.
  • आश्रयस्थान असलेली ठिकाणे खोल नांगरून पिकाचे अवशेष नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा