डाळिंब

पिठ्या ढेकुण

Pseudococcidae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पान, फांद्या, फुल आणि फळांवर पांढरे कापसासारखे समूह दिसतात.
  • पाने पिवळी होऊन गोळा होतात.
  • जीवाणू आणि बुरशीजण्या संक्रमणास बळी पडतात.
  • झाडाची वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते


डाळिंब

लक्षणे

पानांच्या खालच्या बाजुला, फांद्या, फुल आणि फळांवर किड्यांच्या गटाने तयार केलेले पांढरे कापसासारखे समूह दिसतात. प्रादुर्भावामुळे नविन पाने पिवळी पडतात आणि गोळा होतात, ज्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि फळे अकाली गळतात. जुने पाने विकृत होण्याची शक्यता कमी असते. ढेकुण रस शोषण करतेवेळी मधाळ रस सोडतात ह्यामुळे प्रदुर्भावित भाग चिकट होतात आणि संधीसाधु जिवाणू आणि बुरशी तिथे घर करतात. फळे जास्त करुन ह्या हल्ल्याला संवेदनशील असतात आणि विकृत आकाराची होतात किंवा मेणासारख्या स्त्रावाने पूर्णत: आच्छादिली जातात. मधाळ रसाने मुंग्या आकर्षित होऊ शकतात आणि पिठ्या ढेकणाचे इतर झाडांवर वहन करतात. जुनी पाने सहसा विकृत किंवा बेढब होत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

संसर्गाचे पहिले चिन्ह दिसताच, काडीच्या टोकाला कापुस गुंडाळुन तो तेलात किंवा स्पिरीटमध्ये बुडवुन त्यांना पिठ्या ढेकणाच्या संसर्गावर फिरवावे. आपण झाडाला कोमट पाणी आणि थोडा डिटरजंट, पेट्रोल किंवा कीटनाशक साबणाची फवारणी करु शकता. ह्यांच्या प्रसाराचे नियंत्रण करण्यासाठी जवळपासच्या झाडांवर निम तेलाची किंवा पायरेथ्रिनची फवारणी करा. नैसर्गिक शत्रूंमध्ये हिरवे लेसविंग, परजिवी वॅस्प्स, हॉवर माशा, लेडी बर्ड बीटल्, पिठ्या ढेकणांना नष्ट करणारे आणि भक्षक फुलपाखरु स्पालगियस एपियस सामील आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पिठ्या ढेकणावर उपाय करणे फार कठिण आहे कारण ते प्रतिकुल हवामानापासुन त्यांच्या मेणाच्या थराने आणि सुतामुळे संरक्षित आहेत. तरीपण इमिडाक्लोप्रिड, अॅसेटामिप्रिड, आणि क्लोरपायरिफॉसवर आधारीत द्रावणांची फवारणी पिठ्या ढेकणांविरुद्ध परिणामकारक असु शकते.

कशामुळे झाले

पिठ्या ढेकुण हे लंबगोलाकार, पंख नसणारे किडे आहेत जे उबदार किंवा समशीतोष्ण हवामानात सापडतात. त्यांचे शरीर पातळ मेणाच्या थराने संरक्षित असते ज्यामुळे ते कापसासारखे दिसतात. ते त्यांची लांब शोषक सोंड झाडांच्या पेशीत खुपसतात आणि रसशोषण करतात. रसशोषण करताना त्यांनी झाडात सोडलेल्या विषारी द्रव्यांच्या प्रतिक्रियेमुळे लक्षणे दिसतात. पिठ्या ढेकुण जमिनीत अंडी घालतात. उबल्यानंतर पिल्ले आणि प्रौढ जवळच्या रोपांवर रांगत जातात. ते वारा, मुंग्या, जनावरे, पक्षी किंवा छाटणी किंवा कापणी यासारख्या शेतात कामकाजाच्या कालावधीत लांब अंतरापर्यंत पसरू शकतात. त्यांच्या पर्यायी यजमानांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे जसे कि वांगी, रताळी तसेच बऱ्याच प्रकारचे तण यात सामील आहेत. उबदार तापमान आणि कोरडे हवामान त्यांच्या जीवनक्रमास आणि लक्षणांच्या गंभीरतेसाठी अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे किंवा रोपे वापरा.
  • उपद्रवाच्या चिन्हांसाठी शेतावर नियमित लक्ष ठेवा.
  • प्रादुर्भावित झाडे आणि झाडांचे भाग काढुन नष्ट करा.
  • शेतात आणि आजुबाजुने तण नियंत्रण चोखपणे करा.
  • शेताच्या आजुबाजुला पर्यायी यजमान लावु नका.
  • शेतात काम करताना पिठ्या ढेकणाचा प्रसार होणार नाही ह्याची काळजी घ्या.
  • भक्षकांची संख्या चांगल्या शेतीच्या सवयींनी वाढवा उदा.
  • खास पिठ्या ढेकणांसाठीच असलेली कीटनाशके वापरुन.
  • मोसमात शेतात पाणी पाटाने देऊ नका.
  • संतुलित खते वेळेत द्या.
  • खोडावर किंवा फांद्यांवर चिकटपट्ट्या लावुन मुंग्यांचे नियंत्रण करा.
  • शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे निर्जंतुक करण्याची उच्च शिफारस आहे.पीक फेरपालट करताना संवेदनशील नसलेली पिके लावण्याची शिफारस करण्यात येत आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा