खरबूज

पाने खाणारा हडा भूंगेरा

Epilachna vigintioctopunctata

किडा

थोडक्यात

  • पानावरील शिरांमध्ये पाने खाल्याने पेशींना होणारे नुकसान दिसते.
  • पानांच्या फक्त शिराच शिल्लक रहातात.
  • फळांच्या पृष्ठभागावर उथळ छिद्रे दिसतात.
  • नविन रोपे मरतात.
  • संसर्गाने रोपाची वाढ खुंटते आणि खूपच पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

8 पिके

खरबूज

लक्षणे

प्रौढ आणि अळ्या दोन्ही पानांवर ताव मारतात आणि गंभीर नुकसान करतात. पानांच्या शिरांमधील पेशींचे खाल्ल्यामुळे झालेले नुकसान दिसणे हे प्राथमिक लक्षण आहे. नंतर नुकसानाचा विशिष्ट पॅटर्न दिसतो ज्याला स्केलेटोनायझेशन म्हणजे पानांचा फक्त सांगाडा उरतो (मुख्य शिरा आणि देठ). फळांच्या पृष्ठभागावरही उथळ छिद्रे दिसु शकतात. नविन रोपे नष्ट होतात आणि वाढत्या रोपांची वाढ खुंटते. किड्यांमुळे भरपूर पानगळती होते आणि पीकाचे चांगलेच नुकसान होते आणि म्हणुन ह्यांना वांग्याचे सगळ्यात धोकादायक किडे मानले जाते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या किड्यांचे नियंत्रण करण्यासाठी पेडिओबियस कुटुंबातील पॅरासिटॉइड गांधीलमाशी वापरली जाऊ शकते. ह्या माशा फायदेशीर लेडीबर्डवरही हल्ला करतात, म्हणुन किडा कोणता आहे हे गांधीलमाशी वापरण्याआधी समजावुन घेणे महत्वाचे आहे. छोटे जंतुही पान खाणार्‍या बीटल्सना नियंत्रणात ठेऊ शकतात. जैविक कीटनाशके ज्यात बॅसिलस थुरेंगिएनसिस किंवा फंगस अॅस्परजिलस एसपीपी आहे त्याची फवारणी पानांवर केली जाऊ शकते. रिसिनस कम्युनिस (एरंडाच तेल),कॅलोट्रोपिस प्रोसेरा आणि धतुरा इनोक्सियाच्या पानांचा अर्क पानांवर फवारावा. किड लागायच्या सुरवातीच्या काळात जर राख लावली तरी किडे कमी होतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा. जर कीटनाशकांची गरज असेल, तर ज्या उत्पादात डायमेथोएट, फेनवेलरेट, क्लोरोपायरीफॉस, मॅलेथिऑन आहे ते पाल्यापाचोळ्यावर वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

प्रौढ आकाराने लंबगोलाकृती असतात, रंगाने फिके नारिंगी आणि २८ काळे ठिपके असतात आणि पाठीवर छोटे मऊ केस असतात. बीटलची मादी लंबगोलाकृती पिवळी अंडी (०.४-१ मिमी.) उभी आणि छोट्या गुच्छात पानांच्या खालच्या बाजुला घालते. साधारणपणे ४ दिवसात हलक्या पिवळसर-पांढुरक्या अळ्या बाहेर येतात, त्यांचे पाठीचे मणके लांबुळके वेगवेगळे असतात आणि टोकावर गडद रंग असतो. तापमानाप्रमाणे अळ्या १८ दिवसात साधारणपणे ६ मिमी. वाढतात. मग त्या पानांच्या खालच्या बाजुला जाऊन कोषात जातात. आणखीन ४ दिवसानंतर, प्रौढ बीटलची नवी पिढी कोषातुन बाहेर येते. ह्या पुनरुत्पादनाच्या काळात (मार्च-ऑक्टोबर), थंड हवा ह्यांच्या राहणीमानाला आणि संख्या वाढण्यास अनुकूल असते. बीटल जमिनीत किंवा सुक्या पाल्यापाचोळ्यात सुप्तावस्थेत राहू शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास लवचिक, सहनशील किंवा प्रतिरोधक प्रकार वापरा.
  • संसर्गित भागात किंवा जवळपास वांगी लावु नका.
  • पर्यायी यजमान आपल्या शेताच्या जवळपास असल्यास काढा किंवा लावु नका.
  • वाढलेल्या किड्यांची संख्या कमी करण्यासाठी भरपूर पाणी द्या.
  • रोपे आणि शेते यावर किड्यांसाठी लक्ष ठेवा.
  • शेतात किंवा गादीवाफ्यात प्रौढ किंवा अळ्या सापडल्यास त्या हाताने काढा.
  • रोगी रोपे पाळामुळासकट काढुन जाळुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा