चेरी

चेरीवरील फळमाशी

Rhagoletis cerasi

किडा

थोडक्यात

  • कच्ची फळे कुजतात आणि अकाली गळतात.
  • फळांच्या गरात अळ्या सापडतात.
  • फळांवर अळ्यांनी आत शिरण्यासाठी आणि बाहेर निघण्यासाठी केलेली छिद्रे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
चेरी

चेरी

लक्षणे

फळांच्या सालीवर खोलगट छिद्रे दिसतात, ज्याच्या आजुबाजुचा भाग रंगहीन होतो. तरीपण, संक्रमित फळे सामान्य फळांसारखीच दिसतात जोपर्यंत अळ्यांची वाढ पूर्ण होत नाही. पिकत आलेल्या आणि पूर्ण पिकलेल्या फळांच्या पृष्ठभागावर खोलगट आक्रसलेले भाग दिसतात. जर ही फळे कापली तर फळात पुष्कळशा अळ्या आतील गर खाताना दिसतात. संक्रमित चेरी कुजू लागते आणि अकाली गळते. झाडांवर राहिलेली फळे विक्रीयोग्य नसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

काही परजीवी वॅस्पस चेरीवरील फळमाशीच्या अळ्यांवर हल्ला करतात असे अहवाल आहेत. प्रौढांना पकडण्यासाठी चिकट सापळे झाडाच्या बाहेरच्या बाजुच्या दक्षिणेकडील भागाला अडकवावेत. मित्र किड्यांच्या लोकसंख्येवर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणुन काढणीच्या सुमारास चिकट सापळे काढुन टाकावेत. काओलिन क्लेचा वापर पानांवर, फांद्यांवर आणि फळांवर फवार्‍याच्या रुपात केला असता काही कीटक पळुन जातात. स्पिनोसॅड, पायरेथ्रिनवर आधारीत आमिष फवारे किंवा निम मिश्रणे अमोनयाबरोबर मिसळुन वापरल्यासही चांगले परिणाम मिळतात. कार्यक्षमता आर्द्रतेवर आधारीत आहेसे दिसते, कारण कोरड्या हवामानातील भागात परिणाम उत्कृष्ट मिळतात. ब्युव्हेरिया बॅसियाना बुरशीवर आधारीत जैव नियंत्रण ह्या उपद्रवाच्या नियंत्रणासाठी विकसित केले गेले आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अंडी फळांच्या सालीच्या आत घातल्याने आणि अळ्या फळांच्या आतुन गर खात असल्याने चेरीवरील फळमाशांची संख्या कमी करण्यासाठी कीटनाशकांचा वापर परिणामकारक होत नाही. तरीपण, अॅसेटामिप्रिड, मॅलेथियॉन आणि एसफेनव्हॅलेराटे असणारे कीटनाशक प्रौढ बाहेर येऊन अंडी घालण्याच्या वेळेत वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. इतर कीटनाशकेही उपलब्ध आहेत.

कशामुळे झाले

चेरीवरील फळमाशींच्या अळ्यांनी खाल्ल्यामुळे नुकसान होते, ज्या भरपूर गर खातात काहीवेळा अधाशीपणे खातात. माशा जमिनीत कोषात जाऊन विश्रांती घेतात आणि वसंत ऋतुत बाहेर येतात. प्रौढ घरातील सामान्य माशीप्रमाणेच दिसतात पण खूप छोटे असतात. त्यांच्या काळ्या शरीराच्या पाठीवर पिवळी चिन्हे असतात. पंख अर्धपारदर्शक असुन काळे पट्टे असतात आणि ओटीपोटावर अरुंद पांढरे पट्टे असतात. ते परागकण, आणि झाडावर उपस्थित असलेल्या माव्यांनी सोडलेला मधाळ रस खातात. माद्या पुष्कळशी अंडी विकसित होणार्‍या फळांच्या सालीच्या आत घालते. ऊबल्यानंतर पांढुरक्या अळ्या मध्याकडे बोगदे करु लागतात. जिथे त्या तीन अठवड्यांपर्यंत खातात. नंतर फळांच्या सालीला भोक पाडुन बाहेर येतात आणि कोषात जाण्यासाठी जमिनीवर पडतात. प्रतिवर्षी ह्यांची फक्त एकच पिढी होते आणि उष्ण तसेच कोरड्या उन्हाळ्यात बागेत संक्रमण वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • लवकर फळधारणा करणारे वाण लावा म्हणजे त्यावर हल्ला होणार नाही.
  • संक्रमित फळे बागेत काढुन जाळा किंवा पुरा.
  • जंगली किंवा वापरात नसलेली यजमान झाडे काढायला हवीत.
  • जमिनीवर जाळी पसरुन झाडांवरुन पडणार्‍या अळ्या आणि अळ्या असलेली गळलेली फळे अळ्या जमिनीत जाण्याआधी पकडा.
  • बारीक जाळी शेंड्यावर पसरा म्हणजे माशीला फळांवर अंडी घालता येणार नाही.
  • चिकट सापळे वापरुन माशांना पकडता येते.
  • लवकर काढणी केल्याने सर्वात वाईट नुकसान टाळता येते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा