Scolytus mali
किडा
माद्या अंडी घालण्यासाठी बहुधा प्रभावित झाडांची किंवा कोवळ्या रोपांची निवड करतात. निरोगी झाडांच्या साली जोमदार असल्याने त्यावर संक्रमण होण्याचा संभव कमी असतो. खोडावर किंवा फांद्यांवर आत शिरण्याच्या किंवा निघण्याच्या भोकांजवळ विष्ठा सापडते. जर सालीला कापले आणि काढले तर आतील लाकडात थेट बोगदे दिसतात. माद्या लांब मोठा बोगदा सुमारे ५-६ सें.मी.चा (१० सें.मी. पर्यंत) चावुन तयार करते. ते करत असताना ह्या बोगद्यांच्या भिंतींच्या कोनाड्यात ती अंडी घालते. ऊबल्यानंतर, अळ्या थोडे छोटे आणि अरुंद बोगदे सालीखाली तयार करतात, जे मादीने तयार केलेल्या बोगद्यातुन सुरु होतात आणि त्याला जवळपास काटकोनात जातात. हे वैशिष्ट्यपूर्ण बोगदे मयान क्विपूसारखे दिसतात.
स्कोलिटस मालीचे पुष्कळ शिकारी आहेत पण काही अभ्यासात त्यांना जैव नियंत्रण म्हणुन शेतात वापरण्याच्या संभवतेचा विचार केला आहे. पुष्कळ जातीचे पक्षी स्कोलिटस मालीच्या अळ्यांना खातात.स्पाथियस ब्रेव्हिकौडिस जातीचे ब्रॅकोनिड परजीवी वॅस्पसचावापरही लोकसंख्येचे परिणामकारक नियंत्रण करण्यासाठी केला जाऊ शकतो. चालसिड प्रकारचे इतर वॅस्पसचाही (चैरोपॅचिस कोलोन किंवा डिनोटिस्कस अॅपोनियससारख्या इतर) वापर केला जाऊ शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर संक्रमणाच्या पातळीपर्यंत लोकसंख्या पोचली तर कीटनाशकांची गरज आहे आणि प्रौढांवर सर्वात जास्त प्रभावी आहेत. सध्या उपलब्ध असलेले कोणतेही कीटनाशक फ़ळझाडांच्या सालींवरील बीटल्ससाठी नाही.
स्कॉलिटस मालि नावाच्या बीटल्समुळे फळझाडांवर लक्षणे उद्भवतात. ह्या किड्यांच्या अळ्या झायलोफॅगस आहेत म्हणजे त्या लाकडाला सालीच्या आतुन खातात. प्रौढ चकचकीत लालसर तपकिरी असुन डोके काळे असते आणि लांबीला सुमारे २.५-४.५ मि.मी. लांब असतात. माद्या बहुधा अशक्त झालेली रोपे निवडतात, सालीत छिद्र करुन आतील लाकडात बोगदे तयार करतात. ह्या सुमारे १० सेंमी. लांब असु शकणार्या मुख्य बोगद्यांच्या भिंतींच्या कोनाड्यात अंडी घालतात. ऊबल्यानंतर, अळ्या ह्या मुख्य बोगद्यापासुन त्याला काटकोनात असे छोटे आणि अरुंद बोगदे सालीच्या आतुन तयार करतात. वसंत ऋतुत अळ्या तेथील घरट्यात कोषात जातात. सतत ऊबदार हवामान (१८-२० अंश) असल्यास प्रौढ बीटल्स सालीत छिद्रे करुन बाहेर येतात आणि इतर अनुरुप झाडांवर नविन जीवनचक्र सुरु करण्यास उडून जातात. संक्रमण हे आधीच कमजोर असलेल्या झाडांचे लक्षण आहे ज्याची कारणे उदा. बुरशीचे संक्रमण किंवा जमिनीच्या प्रतिकूल परिस्थिती असु शकतात.