Cydia pomonella
किडा
अळ्यांनी फळांत खाण्यामुळे नुकसान होते. फळांच्या सालीवर आत शिरण्याची उथळ छिद्रे दिसतात आणि जिथे अळ्या मेल्या किंवा त्यांना आत शिरता आले नाही आणि म्हणुन ती जागा सोडुन दुसरीकडे गेल्या ह्याच्याशी संदर्भित असतात. जर यशस्वीपणे आत शिरकाव झाल्यास अळ्या फळाच्या गरांत शिरतात आणि खात-खात गाभ्यातील बियांपर्यंत पोचतात. अशा आत शिरण्याच्या छिद्रांभोवती लाल कडा दिसतात ज्यावर अळ्यांची लालसर तपकिरी, ठिसुळ विष्ठा दिसते. जर फळांना कापले तर छोटे पांढरे सुरवंट काही वेळेस गाभ्याजवळ सापडतात. नुकसानित फळे अकाली पिकतात आणि गळतात किंवा बाजारात विक्रीयोग्य रहात नाहीत. जर नियंत्रण केले गेले नाही तर कोणते वाण लावले आहे आणि कोणत्या भागात लावले आहे ह्याप्रमाणे अळ्या फळांचे खूपच, काही वेळा २०-९०% नुकसान करु शकतात. साठवणीच्या काळात खोल शिरकाव झालेला असल्यास गंभीर समस्या होऊ शकते कारण त्या छिद्रात जंतु आणि बुरशी घर करतात ज्यामुळे कूज होते. लवकर तयार होणार्या वाणापेक्षा उशीरा पिकणार्या वाणात गंभीर नुकसान दिसुन येते.
जेव्हा पतंग किंवा फळांवरील छिद्रे दिसतात तेव्हा कॉडलिंग मॉथ ग्रॅन्युलोसिस व्हायरस (CYD-X) चा वापर अठवड्यातुन एकदा करावा. विषाणू फक्त पतंगांच्या अळ्यांनाच प्रभावित करतो आणि त्याचा वापर १% तेलाबरोबर मिसळुन फवारण्यासाठी करायला हवा. उपद्रव नियंत्रणासाठी स्पिनोसॅडसारख्या कीटनाशकांचा वापरही शिफारशीत आहे तरीपण स्पिनोसॅड हे इतर अ-जैव उपायांपेक्षा फार कमी परिणामकारक आहे. मित्र सूत्रकृमी जे अळ्यांत शिरुन त्यांना नष्ट करतात ते बाजारात उपलब्ध आहेत. विरघळणारी काओलिन क्लेचा वापरही ह्या उपद्रवास पळवुन लावण्यासाठी केला जातो आणि नुकसान ५०-६०%नी कमी होऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटनाशकांचे फवारे आणि कामगंध सापळ्यांची योजना करा आणि समायोजन करा. जेव्हा पतंग किंवा फळांवरील छिद्रे दिसतात तेव्हा कॉडलिंग मॉथ ग्रॅन्युलोसिस व्हायरस (CYD-X) चा वापर अठवड्याच्या अंतराने केला जाऊ शकतो. विषाणू फक्त पतंगांच्या अळ्यांनाच प्रभावित करतो आणि त्याचा वापर १% तेलाबरोबर मिसळुन फवारण्यासाठी करायला हवा. उपद्रव नियंत्रणासाठी स्पिनोसॅडसारख्या कीटनाशकांचा वापरही शिफारशीत आहे तरीपण स्पिनोसॅड हे फार कमी ब्रॉड स्केल विषारी आहे.
सिडिया पोमोनेला नावाच्या पतंगाच्या अळीमुळे ही लक्षणे उद्भवतात. प्रौढ सुर्यास्तानंतर आणि सुर्योदयापूर्वी काही तासच सक्रिय असतात आणि जेव्हा सुर्यास्ताचे तापमान १६ डिग्री सेल्शियसच्या वर जाते तेव्हा ते संभोग करतात. पतंगांची पहिली पिढी वसंत ऋतुत किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीला, फुलधारणा होण्याच्या थोड आधी निर्माण होते. उडु लागल्यानंतर एक ते दोन अठवड्यात पतंग फळांवर, एका फळावर एक या दराने अंडी घालतात. छोट्या अळ्या ह्या अंड्यातुन बाहेर येतात आणि फळांच्या सालीला चावु लागतात ज्याने फळांत शिरण्याचा मार्ग तयार होतो. सुरवंट पूर्ण मोठा होण्यासाठी सुमारे तीन ते पाच अठवडे लागतात. मोठ्या अळ्या फळांवरुन खाली पडतात आणि लपण्यासाठी जागा शोधतात, उदा. खोडातील ढोली, फटी. दुसरी पिढी उन्हाळ्यात उशीरा किंवा शरद ऋतुत लवकर निर्माण होते. ही पिढी सुप्तावस्थेत जाण्यासाठी निवारा शोधेपर्यंत पिकलेल्या फळांना नुकसान करते.