इतर

लोकरी मावा

Eriosoma lanigerum

किडा

थोडक्यात

  • विकृत पाने, पिवळसर झाडी, कमी वाढ आणि फांदी मर हे माव्याच्या उपद्रवामुळे होते.
  • रस शोषण केलेल्या ठिकाणी पांढरे, मऊ आच्छादन आणि मधाळ द्रव आढळतो.
  • खोडाची साली, फांद्या आणि मुळांवर देवीचे व्रण (कँकर्स) आणि सूज विकसित होते.
  • जखमा आणि मधाळ रसामुळे संधीसाधू बुरशी आकर्षिल्या जातात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके

इतर

लक्षणे

पांढरे केसाळ किडे कळ्या, फांद्या, काड्या आणि मुळांवर उपद्रव करताना दिसतात. विकृत पाने, पिवळसर झाडी, कमी वाढ आणि फांदी मर हे माव्याच्या उपद्रवामुळे होते. रस शोषण केलेल्या ठिकाणी पांढरे, मऊ आच्छादन आणि मधाळ द्रव आढळतो. खोडाची साली, फांद्या आणि मुळांवर देवीचे व्रण (कँकर्स) आणि सूज दिसणेही वैशिष्ट्य आहे. माव्यांचे जमिनीखालील स्वरुप मुळांवर हल्ला करतात आणि मोठ्या गाठी किंवा सूजलेले भाग तयार करतात. पाणी आणि पोषकांचे नीट वहन न झाल्यामुळे पिवळसर झाडीचे कारण समजते. या गाठी माव्याच्या उपद्रवामुळे दरवर्षी आकाराने मोठ्या होतच रहातात. किड्यांनी केलेल्या जखमांमुळे आणि मधाळ रसामुळे संधीसाधू बुरशी आकर्षित होते आणि संक्रमित भाग काळ्या काजळीने आच्छादला जातो. कोवळी संक्रमित झाडे सहजपणे उपटली जातात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

माव्यांना मारण्यासाठी फवारलेले द्रावण केसाळ आच्छादनाच्या आत जाणे गरजेचे आहे. विरघळवलेल्या अल्कोहॉल द्रावणांना किंवा कीटकनाशक साबणांना केसाळ जागांवर शिंपडले असता ते विचलित होतात. नैसर्गिक तेले किंवा निंबोळी अर्क (२-३ मि.ली. प्रति ली.) याची फवारणी केली जाऊ शकते. सर्व बाजुने उत्तम फवारणी केल्यानंतर ७ दिवसांनी परत फवारणी करणे आवश्यक आहे. परजीवी किंवा शिकारी जसे कि लेसविंग्ज, लेडीबग्ज (एक्झोचोमस क्वाड्रिप्युस्टलेटस), हॉव्हर फ्लाइजच्या अळ्या, आणि परजीवी वॅस्पस (अॅफेलिनस मालि) माव्याच्या लोकसंख्येचे नियंत्रण करु शकतात. कृत्रिम आश्रयस्थाने उदा फॉर्फिक्युला ऑरिक्युलॅरिया इयरविग्ज भक्षकांची संख्या राखते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. निदर्शनात अल्यानंतर किंवा प्रतिबंधक उपाय म्हणुनही रसायनिक नियंत्रणांचा वापर केला जाऊ शकतो. अंतर प्रवाही उपचार देखील माव्याला उपचारीत झाडावर उपाद्रव करण्यापासुन प्रतिबंधित करण्यात मदत करतात. दुर्दैवाने ते मित्रकिडींसाठी घातक ठरू शकतात. प्रतिक्रिया करणार्‍या फवारणीत डेल्टामेथ्रिन, लँब्डा-सिहॅलोथ्रिन आणि अॅसेटामिप्रिड वर आधारीत द्रावणे येतात. कार्बामेटस आणि पायेरथ्रॉइडसना टाळले गेले पाहिजे कारण ते परजीवी आणि भक्षकांना मारुन माव्याच्या उद्रेकास सहाय्य करतात. फुलधारणा होत असलेल्या झाडांना फवारणी करणे टाळावे कारण त्यामुळे परागीकरण करणार्‍या किड्यांना धोका निर्माण होतो.

कशामुळे झाले

एरियोसोमा लॅनिजेरम नावाच्या केसाळ माव्याच्या रस शोषणामुळे ही लक्षणे उद्भवतात. इतर माव्यांच्या विरुद्ध, हा झाडीतुन रस शोषणाऐवजी लाकडी खोडातुन रस शोषतो. किडीवर वैशिष्ट्यपूर्ण पांढरे, जाड, मऊ मेणाचे आच्छादन असते. यजमानाच्या सालीवरील फटीत किंवा जुन्या उपद्रवाच्या ठिकाणी मोठे झालेल्या जखमात ते आपली सुप्तावस्था घालवतात. वसंत ऋतुमध्ये तापमानात वाढ होत असताना, मावा पुन्हा सक्रिय होऊन पुन्हा एक सुरक्षित मुणगे, कोवळे कोंब आणि फांद्यांसारखे (पातळ सालीचे) ठिकाण शोधतात. तिथे ते अधाशीपणे सालीखालुन रस शोषण करतात आणि मऊ केस सोडतात जे अखेरीस वस्तीला आच्छादित करतात. संधीसाधू जंतु नंतर या खुल्या जखमांमध्ये घर करतात. उन्हाळ्यात प्रौढांना पंख फुटतात आणि ते नविन यजमानाच्या शोधात उडुन जातात. बागेच्या जवळपास जर एल्म झाडे असतील तर माव्यांचे सफरचंदांवर स्थलांतर वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • कमी संक्रमण असल्यास किड्यांचे निरीक्षण करुन ब्रशाने घासुन काढले जाऊ शकते.
  • झाडांना बळकट करण्यासाठी वाढ प्रवर्तक किंवा संतुलित खते द्या.
  • मित्र किड्यांची संख्या कमी होऊ नये म्हणुन कीटकनाशकांचा वापर जास्त करणे टाळा.
  • विकसित होणाऱ्या किडींच्या वसाहतीला काढण्यासाठी उन्हाळी छाटणी उन्हाळ्यात उशीरा करा.
  • प्रभावित कोवळे कोंब आणि फांद्या काढुन टाका.
  • माव्यासाठी कमी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी झाडाच्या पायथ्यामधील मुणगे काढा.
  • छाटणीच्या मोठ्या जखमांवर रंग लावा ज्यामुळे मावा त्या जागी आपली वसाहत निर्माण करणार नाही.
  • सफरचंदाच्या बागेजवळ एल्मची झाडे लावु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा