Operophtera brumata
किडा
थंडीतील पतंगाच्या सुरवंटांनी हल्ला केल्याचे, वसंत ऋतुत जेव्हा नविन पाने उमलतात तेव्हा नुकसान दिसते. हे जास्त स्पष्टपणे उन्हाळ्याच्या मध्यावर दिसते, जेव्हा पाने पूर्ण वाढलेली असतात. तोपर्यंत सुरवंटांनी झाड सोडलेले असते पण वसंत ऋतुत केलेली छोटी छिद्रे पानांच्या वाढीबरोबर आता चांगलीच मोठी होऊन पानांचा बराचसा भाग व्यापतात. सुरवंट फुलांच्या कळ्यांना आणि विकसित होणार्या फळांनाही खातात. एकदा का कळीला नुकसान केले कि मग ते इतर कळ्यांवर जातात आणि परत प्रक्रिया चालू करतात. कोवळ्या विकसित होणार्या फळांना लवकर नुकसान झाल्याने उन्हाळ्यात उशीरा त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यातील छिद्रे वाढुन सालीवर खोल चर दिसु लागतात.
शरद ऋतुत धोका असलेल्या झाडांच्या खोडावर खळीची वर्तुळे खोडाला घट्ट चिकटवावीत किंवा गरज भासल्यास त्याला आधार द्यावा. ह्यामुळे माद्या जमिनीतुन शेंड्यापर्यंत पोचत नाहीत. खळीच्या वर्तुळावर घातलेलि अंडी ब्रशाने घासुन काढता येतात. बॅसिलस थुरिंगिएनसिसवर आधारीत उत्पादही सुरवंटांना पळवुन लावण्यासाठी वापरले जाऊ शकतात. नीम अर्क (अॅझाडिराच्टा इंडिका) असलेले वापरही परिणामकारक असतात. स्पिनोसॅड द्रावणेही पाने पूर्ण उमलल्यानंतर अळ्यांना लक्ष्य करुन फवारली जाऊ शकतात. स्पिनोसॅड मधमाशांना धोकादायक असते आणि फुले पूर्ण फुलल्यानंतर वापरु नये
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सुरवंट कळ्यांच्या आत रहात असल्याने कीटनाशकांपासुन सुरक्षित असतात याची नोंद घ्या. डिफ्ल्युबेनझुरॉनवर आधारीत उत्पादांचा वापर एकात्मिक रोप सुरक्षा कार्यक्रमात केला जातो. किड वाढ नियंत्रक टेब्युफेनोझाइड थंडीतील पतंगांविरुद्ध फार परिणामकारक आहे, ते किड्यांना मोल्टिंगपासुन प्रतिबंध करतात आणि म्हणुन किडे मरतात.
ऑपेराफ्टेरा ब्रुमाटा नावाच्या थंडीतील पतंगांच्या सुरवंटांमुळे नुकसान होते. संभोगानंतर माद्या विश्रांती घेणारी अंडी खोडाच्या सालीत, खोडातील खाचात किंवा खोडाच्या सालीतील खपल्यात घालतात. जेव्हा तापमान सुमारे १२-१२ डिग्री सेल्शियस असते तेव्हा ही अंडी ऊबतात. नविन ऊबलेले सुरवंट झाडाच्या खोडावर स्थलांतरीत होतात अाणि नविन येणार्या कळ्यांच्या मधल्या कोषात सरपटत जातात. ते बंद कोषात शिरु शकत नाीत पण ते जसे उघडतात तसे ते खालील मऊ भाग खरवडतात. ओलि उन्हाळे आणि सौम्य तसेच आर्द्र शरद ऋतु ह्या उपद्रवाच्या जीवनचक्राला मानवते. प्रौढ सुरवंट खाली पडुन जमिनीत कोषात जातात. अॅप्रिकॉट, चेरी, सफरचंद, प्लम, करंट आणि काही जंगली झाडे यांच्या यजमानात मोडतात.