केळी

फुलकिडे

Thysanoptera

किडा

थोडक्यात

  • पानांच्या वरच्या बाजुला बारीक चंदेरी चट्टे पडलेले दिसतात व ह्या प्रकाराला “सिल्व्हरिंग” असे म्हणतात.
  • फुलकिडे आकाराने लहान (१-२ मि.मी लांबीचे), पिवळसर ते फिकट तपकिरी चपटे असतात आणि पानांच्या खालच्या बाजुला शेणाच्या ठिपक्यासारखे काळे दिसतात.
  • प्रादुर्भाव ज्यास्त झाल्यास पाने, फुले आणि फळे वेडीवाकडी होतात.

मध्ये देखील मिळू शकते

41 पिके
सफरचंद
जर्दाळू
केळी
जव
अधिक

केळी

लक्षणे

पानांच्या वरच्या बाजुला छोटे चंदेरी चट्टे पडलेले दिसतात व ह्या प्रकाराला “सिल्व्हरिंग” असे म्हणतात आणि हेच पांढरट चट्टे फुल पाकळ्यांवर पण येऊ शकतात. फुलकिडे व त्यांची पिल्ले पानांच्या खालच्या बाजुला पुंजक्यांनी त्यांच्या काळ्या शेणासारख्या डागांजवळ बसतात. प्रादुर्भाव ज्यास्त झाल्यास पाने पिवळी, सुकलेली, वेडीवाकडी किंवा आक्रसलेली दिसतात. फुल व कळीधारणेच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास कळीची वाढ खुंटते व खरवडलेली आणि वेडीवाकडी फळे येऊन फळांची प्रत खालावते व उत्पादनात लक्षणीय घट आढळून येते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

काही ठराविक फुलकिड्यांच्या प्रजातींसाठी काही जैव नियंत्रक उपाय विकसित केले गेले आहेत. इतर कोणत्याही कीटकनाशकापेक्षा किंवा इतर जैविक फॉर्म्युलेशन पेक्षाही स्पिनोसॅडचा वापर फुलकिड्यांविरुद्ध साधारणपणे जास्त परिणामकारक ठरतो. हे मध्यम अंतरप्रवाही असून ह्याचा परिणाम एक अठवडा किंवा थोडा जास्त काळापर्यंत टिकतो, तथापि हे काही मित्रकिडींसाठी (उदा. भक्षक कोळी, सिरफिड माशीच्या अळ्या) आणि मधमाशांसाठी विषारी असल्याकारणाने फुलधारणेच्या काळात ह्याचा वापर टाळावा. फुलकिड्यांचे संक्रमन झाले असता लसूण अर्क काही कीटनाशकाबरोबर वापरल्यास चांगले परिणाम दिसतात. ज्या प्रजाती फक्त पानांवर उपजिविका करतात पण फुलांवर हल्ला करत नाहीत त्यांच्या नियंत्रणासाठी नीमतेल किंवा नैसर्गिक पारेथ्रिनची, खासकरुन पानांच्या खालच्या बाजुने केलेली फवारणी कारगर ठरते. चांगल्या परिणामकारक परावर्तनशील युव्ही आच्छादनाचा (मेटलाइझ्ड रिफ्लेक्टिव्हमल्च) वापर करण्याची शिफारस केली आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उच्च प्रजोत्पादनाच्या दरामुळे आणि त्यांच्या जीवनचक्रामुळे, फुलकिड्यांनी विविध श्रेणींच्या कीटनाशकांविरुद्ध प्रतिरोध निर्माण केला आहे. प्रभाव वाढविण्यासाठी पिपेरोनिल ब्युटॉक्साइड सह, फिप्रोनिल, इमिडाक्लोप्रिड किंवा अॅसेटामिप्रिड बरोबर मिसळले जाते अशा स्पर्शजन्य कीटनाशकांचा वापर अत्यंत परिणामकारक ठरते.

कशामुळे झाले

फुलकिडे १-२ मि.मी लांबीचे, पिवळे, काळे किंवा दोन्ही रंगाचे असतात काही प्रजातींना पंखाच्या जोड्या असतात तर इतरांना अजिबात पंख नसतात. ते सुप्तावस्थेत झाडांच्या अवशेषात किंवा जमिनीत किंवा पर्यायी यजमानांच्या झाडात रहातात. बरेच विषाणूजन्य रोगांचे ते वाहक आहेत. कोरडे आणि गरमट वातावरण त्यांच्या वाढीस पोषक असते तर जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात त्यांची उत्पत्ती खुंटते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाणांची लागवड करा.
  • प्लास्टिक किंवा पालापाचोळ्याचे आच्छादन ओळींमध्ये घालुन संक्रमणाच्या घटना आणि फुलकिड्यांचा प्रसार कमी करा.
  • संवेदनशील झाडे तणांजवळ न लावण्याची खरबदारी घ्या.
  • प्रमाणित हरितगृहांकडुन आणि रोपवाटिकांतुनच विषाणू आणि फुलकिडे मुक्त रोपे मिळवा.
  • मूल्यांकनासाठी शेताचे नियमित निरीक्षण करत चला.
  • मोठ्या भागात मोठ्या संख्येने फुलकिड्यांना पकडण्यासाटी चिकट सापळे लावा.
  • पर्यायी यजमानांजवल लागवड करणे टाळा.
  • कोंबांची छाटणी करण्याऐवजी फांद्याफुटींची आणि पेरांची छाटणी करा.
  • संक्रमित रोपे, रोपांचा कचरा गोळा करुन नष्ट करा.
  • रोपांना भरपूर पाणी द्या आणि जास्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा