आंबा

आंब्याच्या पानांवर थर देणारे कोळी

Cisaberoptus kenyae

कोळी

थोडक्यात

  • पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पांढरा थर दिसतो.
  • पाने रंगहीन होतात.
  • पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

कोळी गटाने रहातात आणि पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पांढरा किंवा मेणचट थर बनवितात. हे थर नंतर पांढर्‍या धाग्यात बदलुन कडक होतात आणि पूर्ण पानास रुपेरी आवरणाने झाकतात. कोळी पानातुन रस शोषण करतात ज्यामुळे पाने रंगहीन होतात. गंभीरपणे संक्रमित झालेली पाने कोरडी आणि रंगाने तपकिरी-काळी दिसतात. प्रभावित पाने बहुधा पिवळी पडल्यानंतर गळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

हा लहान उपद्रव असल्याने फळ उत्पादनावर याचा फारसा परिणाम होत नाही, म्हणुन जैविक नियंत्रण गरजेचे नाही. फक्त व्यवस्थापनाच्या चांगल्या सवयी वागवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. हा लहान उपद्रव असल्याने फळ उत्पादनावर याचा फारसा परिणाम होत नाही, म्हणुन यांच्या संसर्गासाठी रसायनिक कोळीनाशकांची गरज भासत नाही.

कशामुळे झाले

पानांवर थर देणार्‍या कोळ्यांच्या सर्व सक्रिय जीवनाच्या टप्प्यांमुळे नुकसान होते. कोळी अत्यंत सूक्ष्म, बहुधा सुमारे ०.२ मि.मी. असतात आणि उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. ते फिकट रंगाचे आणि दंडाकृती असतात तर अंडी फिकट पांढरी, गोल आणि चपटी असतात. कोळीच्या सर्व सक्रिय जीवन अवस्था पानावरील थरांखालीच रहातात आणि रस शोषण करतात. कोळी बहुधा आंब्याच्या अवास्तव वाढलेल्या किंवा दुर्लक्षित झाडांनाच संक्रमित करतात. कोळीची लोकसंख्या मार्चमध्ये शिखरावर पोहोचते आणि डिसेंबरमध्ये कमी होते. उन्ह्याळ्याच्या महिन्यात संक्रमण गंभीर होते.


प्रतिबंधक उपाय

  • तोडणीनंतर प्रभावित कोंब छाटा.
  • पांढरा थर असलेली पाने काढुन नष्ट करा.
  • संक्रमण कमी करण्यासाठी झाडीची थोडी छाटणी अशा प्रकारे करा जेणेकरून पानांपर्यंत चांगला सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा