Phyllocoptruta oleivora
कोळी
पीकाचे वाण आणि फळांच्या पक्वतेवर लक्षणे अवलंबुन असतात. बहुधा, लिंबुवर्गीय पिकांवरील लाल कोळीची लागण पहिल्यांदा पक्व नारांगीच्या फळाच्या, पानांच्या आणि फांद्यांच्या सालीवर लालसरपणा दिसल्याने लक्षात येते. हिरव्या फांद्या, पाने आणि फळांवर उपाद्रवाचे नुकसान दिसते. कोळी पानात राहुन पानाच्या आणि फळांच्या सालीत टोचुन लाळ सोडतात ज्यामुळे सालीतील पेशी मरतात. वरच्या थरातील पेशींची चकाकी जाते आणि त्या निरस तसेच लालसर दिसतात किंवा पिवळ्या धब्ब्यात लालसर तपकिरीपणा दिसतो. सुरवातीला पानांच्या खालच्या बाजुला फिकट धब्बे येतात आणि नंतर ते करपतात. लिंबुवरील उपाद्रवामुळे फळांच्या सालीतील पेशी मरतात आणि पृष्ठभाग रुपेरी होतो, पक्व नारंगीत तो लालसर तपकिरी होतो तर हिरव्या नारिंगात तो काळसर होतो. जेव्हा लाल कोळीच्या जखमा हंगामाच्या सुरुवातीलाच होतात तेव्हा याला "रसेटिंग" होणे म्हणतात आणि जेव्हा फळे पक्व होऊन जखमा झाल्या तर त्याला "ब्राँझिंग" होणे म्हणतात. जखमा झालेला पृष्ठभाग गुळगुळीत आणि रंगाने गडद तपकिरी असतो आणि जास्त काळ झाडावरच फळे राहिल्याने त्यावरील डाग जास्तच वाढतात. संक्रमित फळांना जर पक्वतेच्या आधीच लागण झालेली असली तर ती फळा आकाराने लहान होतात. जास्त संक्रमणामुळे कोवळ्या रोपाचे गंभीर नुकसान होऊ शकते. जेव्हा लिंबुवर्गीय पिकांवरील लाल कोळी वसंत ऋतुच्या सुरूवातीच फळांना उपाद्रव केल्यास, फळाची साल खरबडीत आणि उन्हाळ्याच्या तुलनेत जास्त फिकट होते. ह्याला शार्कस्किन असे संदर्भित केले जाते.
युसियस सिट्रिफॉलियस, प्रोनेमाटस अन्बिक्विटस आणि अँब्लिसियस प्रजाती आणि परजीवी बुरशी, हिर्सुटेला थॉम्पसोनि सारखे भक्षक लाल कोळीवर हल्ला करतात आणि त्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. तेल (३ चहाचे चमचे गोड तेल, ४ ली. पाणी आणि अर्धा टेबलस्पून डिटरजंट साबण) किंवा साबण द्रावण (२ टेबलस्पून साबण किंवा धुण्याचा द्रव, ४ ली. पाणी) यांवर आधारीत फवारणी केल्यास कोळीचे संक्रमण कमी होते. जर तापमान ३५ अंशावर असेल तर तेलाची फवारणी करणे टाळा. फवारणी नेहमी पानांच्या खालच्या बाजुला करा आणि गरज भासल्यास ३-४ अठवड्यांनी परत फवारणी करा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर ३०% पेक्षा जास्त झाडे संक्रमित झालेली असली तरच उपचार करा. रसायनिक उपचार काळजीपूर्वक निवडा कारण यामुळे मित्र किडींवरही प्रभाव पडु शकतो. सगळी कोळीनाशके वर्षांतुन फक्त एकदाच वापरली जावीत जेणेकरुन त्याचा प्रतिकार विकसित होणार नाही. स्पिरोडायक्लोफेन, डायफ्लयुबेनझ्युरॉन, अॅबामेक्टिन, अॅसेक्विनॉसिल, स्पिरोटेट्रामॅट, मायक्रोनाइझ्ड किंवा वेटेबल सल्फर, फेनपायरोक्झिमेट आणि क्लोरपायरीफॉस सारखी कीटकनाशके कोळीच्या समुदायाचा पूर्ण नायनाट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
प्रौढ लाल कोळीच्या उपाद्रवाने नुकसान होते. ह्याचे वैशिष्ट्य फारच सूक्ष्म असते आणि उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. जर फळांवर किंवा पानांच्या पृष्ठभागावर मोठ्या संख्येने उपस्थिती असली तरच लक्षात येते. हे धुळीच्या बारीक थरासारखे दिसतात. पांढरी, गोलाकार अंडी, छोट्या पुंजक्यांनी पानाच्या किंवा फळांच्या पृष्ठभागावर घातली जातात. अंड्यातुन बाहेर येणारी अळी प्रौढत्वास पोचण्यापूर्वी दोन सक्रिय अळी टप्प्यातुन जाते. ३० अंश तापमान असल्यास कोळीची एक पिढी ६ दिवसात पूर्ण होते. माद्या सुमारे ४-६ अठवडे जगतात आणि पूर्ण जीवनात सुमारे ३० अंडी घालतात. सातत्याने एखादेच डाग असलेले फळ दिसणे ही बागेत लाल कोलीची लागण झाल्याचे पहिले चिन्ह आहे. हे जर ठराविक हंगामात दिसले तर त्याला पुढच्या हंगामातील लाल कोळीची लागण होण्याची गंभीर ताकीद समजावी. ह्या उपद्रवास आर्द्र परिस्थिती आवडते आणि उष्णकटिबंधीय तसेच उपउष्णकटिबंधीय हवामानात ते सर्वसामान्यपणे आढळतात. कोळीचा प्रसार एका झाडावरुन दुसर्या झाडावर वार्याने होतो.