Colomerus vitis
कोळी
लक्षणे शक्यतो कोळ्याचा प्रकार, द्राक्षांची जात आणि हवामानावर अवलंबुन असतात. सगळ्यात जास्त लक्षणे वसंत ऋतुच्या शेवटी जेव्हा पानांच्या वरच्या पृष्ठभागावर फोड आल्यासारखे उंचवटे दिसतात तेव्हा निदर्शनात येतात. दोन उंचवट्यांच्या मध्ये बारीक पांढरट ते गुलाबीसर लाल केसांचे थर दिसतात. बारीक पारदर्शक कोळी ह्या केसांच्या आवरणाच्या संरक्षणाखाली सुरक्षित असतात. नंतर हे उंचवटे व केसांचे थर वाळून तपकिरी होतात. काही देशांमध्ये कोळ्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे वेगळ्या प्रकारे निदर्शनात आलेली आहेत उदाहरणार्थ सुरुवातीला पाने वेडीवाकडी होतात तसेच कळ्या आणि पाने गुंडाळतात.
गॅलेनड्रोमस ऑक्सिडेंटालिस नावाचे शिकारी कोळी ह्या फोड आणणार्या कोळ्यांना खातात आणि त्यांची संख्या कमी करण्यात परिणामकारक आढळुन आले आहेत. कोळीनाशक किंवा नीम तेल ही वापरले जाऊ शकते पण ह्यामुळे मित्रकिड्यांची संख्याही कमी होऊ शकते. पाण्यात विरघळणारा सल्फर (गंधक) चे वापर ही परिणामकारक ठरू शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. स्पिरोटेट्रामॅटला ह्या कोळ्या विरोधात परिणामकारकरित्या वापरले गेले आहे. द्रावाचे शोषण होण्यासाठी पानांची संख्या पुरेशी आहे ह्याची काळजी घ्या आणि दोन फवारण्यांमध्ये ३० दिवसांचे अंतर ठेवा. पाण्यात विरघळणारा सल्फर (गंधक) ही वापरला जाऊ शकतो.
कोलोमेरुस व्हिटिस नावाच्या ह्या कोळ्यामुळे पानांवर फोडासारखी सूज येणे अशी स्पष्ट लक्षणे दिसत असली तरी ह्यांना द्राक्षांचे जास्त उपद्रवकारी किडे समजले जात नाही. बारीक रस शोषक कोळी संपूर्ण द्राक्षांच्या वेलीचे नुकसान करतात. रस शोषण करताना ते पानांमध्ये काही हार्मोन्स सोडत असल्याने पानांची वाढ खुंटते आणि वैशिष्ट्यपूर्ण सूजलेले फोड दिसतात. हे कोळी द्राक्षांच्या वेलीत उदा. कळीच्या कोंबाखाली आपली सुप्तावस्था घालवतात. ते वसंत ऋतूमध्ये कार्यरत होऊन नवीन पानांच्या खालच्या बाजूला जाऊन रस शोषण करण्यास सुरुवात करतात. उन्हाळ्याच्या शेवटी, ते झाडाची पाने सोडून कळीच्या कोंबाखाली आपली सुप्तावस्था घालवतात. पानांच्या खालच्या बाजुला दिसणार्या कवचाला बुरशीचा रोग समजले जाऊ नये (मिल्ड्युसारखे). उबदार हवामानातील जलद पिकांच्या वाढी दरम्यान लक्षणे अधिक गंभीर असतात परंतु ह्या कोळ्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर फारसा गंभीर परिणाम दिसुन येत नाही.