Panonychus citri
कोळी
झाडाच्या कडेच्या पानांवर वैशिष्ट्यपूर्ण बारीक राखाडी किंवा रुपेरी ठिपके येतात ज्या प्रक्रियेला स्टिपलिंग असे म्हणतात. क्वचितच, फळे आणि फांद्या देखील प्रभावित होतात. प्रादुर्भावाची पातळी उच्च असताना हे ठिपके डागांसारखे येतात आणि पान किंवा फळांना रुपेरी किंवा तांबुस रंग देतात. पानांच्या खराब झालेल्या भागांमुळे तिथे प्रकाश्संस्लेषण कमी होते, ज्यामुळे फळांची प्रत तसेच झाडाचा जोम देखील कमी होतो. हे विशेषतः प्रतिकूल वातावरण परिस्थितीत उदा. कोरडे, वादळी हवामानात जास्त होते. या व्यतिरिक्त पाण्याचा चांगला पुरवठा केल्यास या प्रादुर्भावाची घटना आणि उपद्रवाने केलेले नुकसान कमी होते.
पॅनोनिचस सिट्रीचे भक्षक आणि नैसर्गिक शत्रु भरपूर असल्याने यांचा प्रसार नियंत्रित करणे सोपे आहे. विविध देशात बरेच फयटोसिड कोळी (उदा. युसियस स्टिप्युलेटस) लिंबुवर्गीय पिकांवरील लाल कोळ्याच्या नियंत्रणासाठी त्यांची संख्या कमी असताना परिणामकारकरित्या वापरले गेले आहेत. स्टेथोरस कुटुंबातील लेडीबर्डच्या काही प्रजाती या किड्यांना आधाशासारखे खातात. बुरशी आणि विशेषत: विषाणू, बागेतील पॅनोनिचस सिट्रीच्या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, तापमानावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ठराविक कीटकनाशकांची शिफारस करण्यात येते, कारण विस्तृत श्रेणीच्या कीटनाशकांमुळे परिस्थितीत आणखीन बिघाड होऊ शकते. उदा. सिंथेटिक पायरेथ्रॉइडसच्या वापराने या कोळीची साथ येऊ शकते. विविध प्रकारचे कोळीनाशक वापरल्याने प्रतिकार निर्माण होत नाही.
पॅनोनिचस सिट्रि नावाच्या लिंबुवर्गीय पिकांवरील लाल कोळ्याच्या प्रौढ आणि पिल्लांच्या रसशोषणामुळे लक्षणे उद्भवतात. त्यांचे शरीर वैशिष्ट्यपूर्ण विटेसारख्या लाल रंगाचे आणि पियर फळाच्या आकाराचे असुन पाठीवरील मोत्यासारख्या भागातुन मजबूत पांढरे केस उगवतात. हे लिंबुवर्गीय झाडांना प्रभावित करतात आणि क्वचितच पपई, कसावा किंवा द्राक्षासारख्या इतर पिकांवर देखील हल्ला करतात. ते पानाच्या दोन्ही बाजूंवर आढळतात पण रससोषण शक्यतो पानाच्या वरच्या पृष्ठभागांवरच करतात. कोळी तयार करत असलेल्या रेशमी जाळ्यामुळे त्यांचे वहन वार्याने इतर झाडांवर होते. कीट आणि पक्षी यांचा प्रसार करतात. संक्रमित हत्यारे आणि शेतीच्या वाईट सवयीसुद्धा या उपद्रवाला इतर बागात पसरवितात. चांगल्या सिंचन पद्धतीबरोबर चांगला पाणी पुरवठा केल्यास झाडांवरुन यांचा उपद्रव बराच कमी होतो. या विरुद्ध, कमी किंवा उच्च आर्द्रता, जोरदार वारा, दुष्काळ किंवा मूळ प्रणालींचे बरोबर विकसित न होणे यामुळे परिस्थितीत जास्त बिघाड होऊ शकतो. २५ डिग्री सेल्शियसचे तापमान आणि ५०-७०% आर्द्रता असे हवामान लिंबुवर्गीय पिकांवरील लाल कोळ्यांना भावते.