Panonychus ulmi
कोळी
थोडेसेच संक्रमण झाले असता फिकट ब्राँझ रंगाचे ठिपके पानांवर मध्यशिरांच्या बाजुने दिसतात. जशी कोळ्यांची संख्या वाढते, तसे ठिपके जे कोळ्यांनी रस शोषल्यामुळे उमटतात, ते पूर्ण पानावर पसरतात. पाने वरच्या बाजुला मुडपतात आणि झाडी ब्राँझ किंवा लालसर तपकिरी रंगाची दिसु लागते. पानांना आणि कळ्यांना झालेल्या नुकसानामुळे झाडाची प्रकाश विश्र्लेषण क्रिया प्रभावित होते ज्यामुळे फुटव्यांची वाढ कमी होते, लाकडाची वाढ चांगली होत नाही, फळे चांगली पिकत नाहीत किंवा अकाली गळतात. फुटवे, थंडीतील गोठण्यास संवेदनशील होतात आणि नंतरच्या हंगामात फुलधारणा कमी होते.
फळांच्या बागेत शिकारी कोळ्यांद्वारेही जैव नियंत्रण केले जाऊ शकते. आणखी म्हणजे फ्लॉवर बग्ज, लेडीबग्ज, कॅस्पिड बग्जच्या काही प्रजाती तसेच ग्लासी विंग्ड मिरिड बग (ह्यालियोडस व्हिट्रिपेनिस) किंवा स्टेथोरस पंक्टमही नैसर्गिक विरोधकात मोडतात. मान्यताप्राप्त नॅरो रेंजची तेलेही वापरली जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर लोकसंख्या मान्य सीमेपलीकडे गेली आणि थंडीच्या दिवसात लाल अंड्यांचे पुंजके फुटव्यांच्या टोकावर सापडले तर अॅकारिसाइडस किंवा कोळीनाशकांचा उपचार करावा. सर्वसामान्यपणे रसायनिक उपचारांचे प्रमाण किमान ठेवा. कारण ह्यामुळे मित्र किड्यांवर प्रभाव पडु शकतो आणि कोळ्यांच्या काही जाती याचा प्रतिकार निर्माण करु शकतात. बागायती खनिज तेलाचा वापरही ह्यांची संख्या कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
युरोपियन लाल कोळ्याच्या (पॅनोनिचस उल्मि) खाण्यामुळे लक्षणे उद्भवतात, जे पुष्कळशा पोम आणि स्टोन (पोम म्हणजे सफरचंदासारखी फळे ज्यांच्या गाभ्यात बिया एकत्रितपणे असतात आणि स्टोन म्हणजे टणक बी असलेली फणसासारखी फळे) फळांच्या झाडांना , तसेच द्राक्षांच्या वेलींनाही संक्रमित करतात. नर पिवळसर लाल, पाठीवर दोन लाल डाग असलेले आणि सुमारे ०.३० मि.मी. लांब असतात. माद्या थोड्या जास्त लांब (०.३५ मि.मी.) आणि नरांपेक्षा जास्त अंडाकृती असतात. त्यांचे वैशिष्ट्य आहे विटांसारख्या लाल रंगाचे शरीर आणि पाठीवरील मोत्यासारख्या भागातुन डोकावणारे मजबुत पांढरे केस. ते उन्हाळ्यात उशीरा लाल रंगाची अंडी मुख्यत: सालीच्या फटीत, फळांच्या पाकळ्यांमध्ये किंवा न उमललेल्या कळ्यांवर आणि वसंत ऋतुत पानांच्या खालच्या बाजुला घालतात. ह्यांच्या वर्षातुन होणार्या पुष्कळ पिढ्यांचे नियमन तापमानाने आणि खाद्य पुरवठ्याने केले जाते आणि थंड हवेत ह्यांच्या २-३ पिढ्या होतात तर ऊबदार हवामानात ८ पर्यंत होतात. नत्र जास्त दिल्याने झाडीची वाढ चांगली होते आणि किड्यांना अनुकूल असते. वारा आणि पाऊस ह्या किड्यांचे आयुष्य कमी करतो.