Eriophyidae
कोळी
पानांवर मोठ्या संख्येने वाढलेले भाग ( ज्यांना गाठी म्हटले जाते) येतात. कोळ्यांच्या प्रजातीप्रमाणे पानांच्या कडा जाड होतात. केसांच्या जास्त वाढीमुळे पानांच्या खालच्या बाजुला मखमली लव दिसते. गाठींचा रंग पिवळा ते लाल असतो. कोंब खुजे असतात आणि कळ्या चांगल्याच मोठ्या होतात. कोळ्यांनी खाल्यामुळे पानांच्या पृष्ठभागावर उंचावलेल्या रचना दिसतात. फुटवे फाटल्याने झाडे "चेटकीच्या झाडु"सारखी दिसतात. पाने तांबट होणेही शक्य आहे.
पुष्कळ वेळा कोणत्याही उपचारांची गरज भासत नाही. जर संक्रमण गंभीर असेल, तर झाडाचे प्रभावित भाग छाटले जाऊ शकतात. कोळ्यांनी केलेल्या नुकसानापेक्षा छाटणीमुळे जास्त नुकसान होऊ शकेल का याचा विचार करा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उपलब्ध असल्यास जैविक उपचारांसह अॅबामेक्टिन किंवा बायफेनथ्रिन असणार्या कीटनाशकांचे/कोळीनाशकांचे प्रतिबंधक फवारे मारल्यास झाडांचे कोळ्यांच्या संसर्गापासुन सुरक्षा होते. विरघळणार्या गंधकाचे द्रावणही मदत करु शकते पण त्यामुळे मित्र किड्यांनाही नुकसान पोचु शकते.
अतिसूक्ष्म कोळ्यांमुळे, बहुधा ०.२ मि.मी. आकाराच्या, कोळ्यांमुळे नुकसान होते, जे मुख्यत:ना संक्रमित करतात, पण फळांच्या झाडांना किंवा अक्रोडाच्या झाडांनाही प्रभावित करतात. ह्या ठराविक कोळ्यांचे शरीर लांबट असुन दोन जोड्या पायांच्या असतात, इतर कोळ्यांच्या विरुद्ध ज्यांना पायाच्या चार जोड्या असतात. ते सालीत किंवा कळीच्या कोषाखाली विश्रांती घेतात आणि वसंत ऋतुत खाणे आणि अंडी घालण्यास सुरवात करतात. ते पानांच्या भागातुन रस शोषण करतात आणि हे करत असताना, ते रोपांच्या भागात रसायने सोडतात ज्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण गाठी तयार होतात. ह्या गाठी रोपाच्या रसाने भरलेल्या असतात आणि कोळ्या ह्या गाठीतुन शोषत खात रहातात. ते सहसा यजमानाला गंभीर नुकसान करीत नाहीत.