मका

मक्का पिकावरील तांबेरा

Striga hermonthica

तण

थोडक्यात

  • चमकदार हिरवी पाने आणि बारीक चमकदार जांभळ्या रंगाची फुले येणारी झाडे पीकाभोवती येतात.
  • यजमान झाडांची वाढ खुंटणे, पिवळी पडणे आणि मर होणे अशी लक्षणे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

जांभळी चेटकी तण म्हणुनही ओळखल्या जाण्यार्‍या या झाडाची, चमकदार हिरव्या फांद्या आणि पाने तसेच बारीक चमकदार जांभळी फुले ही वैशिष्ट्य आहेत. ही झाडे पीकांवर परजीवी आहेत आणि यजमान झाडातून पाणी तसेच पोषके शोषतात ज्यामुळे दुष्काळासारखी किंवा पिवळेपणा, पानांची मरगळ, झाडाची वाढ खुंटणे यासारखी पोषक कमतरतेची लक्षणे दिसतात. संक्रमणाच्या सुरवातीस स्ट्रायगा दिसण्याआधीची लक्षणे निदान करण्यास कठिण आहेत कारण ती पोषकांच्या कमतरतेसारखीच असतात. एकदा का स्ट्रायगा दिसु लागला कि त्याला नष्ट केले तरी नुकसान भरपाई करण्यास खूपच उशीर झालेला असतो यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

चेटकी तण हे सर्व परजीवी झाडात मुख्यतः उच्च संख्येने बिया तयार करण्याच्या आणि त्यांच्या जास्त काळ सुप्तावस्थेत रहाण्याच्या क्षमतेमुळे नियंत्रण करण्यास अतिशय कठिण आहेत. प्रभावित झाडांना फुलोर्‍याच्या आधीच पाळामुळासकट उपटुन जाळावे. फ्युसारियम ऑक्सीस्पोरम बुरशीला जैव नियंत्रण म्हणुन चेटकी तणाविरुद्ध वापरले जाऊ शकते कारण ती स्ट्रायगाच्या झाडाच्या वाहिन्यांच्या भागाला संक्रमित करते आणि त्याची वाढ रोखते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. चेटकी तणाविरुद्ध तणनाशके उपलब्ध असुन ती फार महाग असतात आणि ते पिकांवर देखील प्रभाव पडु शकतात. फवारणी करणाऱ्याला संरक्षणाची गरज असते आणि तणनाशक उपयुक्त झाडांना देखील प्रभावित करू शकतात. बाजरी आणि ज्वारीमध्ये तणनाशकांची बीज प्रक्रिया करून पाहिल्यास संक्रमणात ८०% घट दिसुन आली आहे. या उपचारात तणनाशक प्रतिकारक वाणाचे बियाणे तणनाशकांच्या द्रावणात पेरणीपूर्वी बुडवुन ठेवायचे असते.

कशामुळे झाले

स्ट्रायगा हेरमोनथिका नावाच्या परजीवी झाडामुळे ही लक्षणे उद्भवतात, ज्याला जांभळी चेटकी तण किंवा राक्षसी चेटक तण नावानेही ओळखले जाते. याची समस्या जास्त करुन उप सहार्‍याच्या आफ्रिकन भागात जाणवते. हे तृण धान्य, गवत, डाळी, भात, मका, ज्वारी, बाजरी, ऊस आणि चवळीसाठी खूप गंभीर समस्या आहेत. प्रत्येक वेल ९०००० ते ५००००० बिया बनविते ज्या जमिनीत १० वर्षांपर्यंत सुप्तावस्थेत राहू शकतात. या बिया जमिनीत रहातात आणि त्यांचे वारा, पाणी, प्राण्यांद्वारे किंवा मानवी अवजारांद्वारे वहन होते. जेव्हा हवामान परिस्थिती अनुकूल असते आणि यजमानांच्या मुळांपासुन काही सेंटीमीटर अंतरावर असतात त्या उगवतात. एकदा का त्या मुळांच्या संपर्कात आल्या कि परजीवी संबंध सुरु होतात. नत्र भरपूर असलेल्या खतांच्या वापरामुळेही चेटकी तणांचा संक्रमण दर कमी होतो.


प्रतिबंधक उपाय

  • पीकांत जोम रहाण्यासाठी शक्तीवर्धके वापरा.
  • मोसमाच्या सुरवातीला शेणखताचा वापर भरपूर करा.
  • डेसमोडियम कुटुंबातील झाडे शेतात लावा ज्यामुळे स्ट्रायगाला पीकाच्या मुळांशी चिकटण्यापासुन प्रतिबंध होईल.
  • नॅपियर गवत शेताच्या आजुबाजुला लावल्यासही स्ट्रायगाला मुख्या पीकांपासुन दूर ठेवण्यात मदत होते.
  • सर्व हत्यारे, अवजारे, कपडे आणि पायताणे संक्रमित शेतात काम केल्यानंतर काळजीपूर्वक स्वच्छ करा.
  • पीकाला योग्य मात्रेत नत्रयुक्त खते द्या.
  • डाळिंच्या पिकांसह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा