Pseudomonas syringae pv. tabaci
जीवाणू
लक्षणे जलदगतीने बळावतात. ठिपके प्रामुख्याने पानांवर येतात पण फांद्यांवर, फुलांवर आणि तंबाखूच्या फळांवरही येऊ शकतात. ठिपक्यांसभोवताली पिवळी प्रभावळ असते. ठिपके सुरवातीस बारिक, फिकट हिरवे, गोलाकार असतात पण केंद्रातील पेशी मेल्यानंतर तपकिरी होतात. ठिपके एकमेकात मिसळतातही. गंभीर बाबतीत पानांचे नुकसानीत भाग गळुन पडतात आणि फक्त पानांच्या शिरांचा सांगाडा शिल्लक रहातो. वाईल्ड फायर रोग पिकास वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो, अगदी रोपवाटीकेतील रोपासही.
वाईल्डफायरच्या नियंत्रणाचे पर्याय हे प्रतिबंधक उपाय आणि शेतीच्या चांगल्या सवयीतच सीमित आहेत.
ह्या जीवांणूंच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणासारखे कॉपरवर आधारीत रसायनांचा वापर, झाडाच्या वाढीच्या सुरवातीच्याच टप्प्यांवर करावा. जिथे कृषीतील वापर मान्यता प्राप्त आहे त्या भागात, अँटिबायोटिक (प्रतिजैविक) स्ट्रेप्टोमायसिनचा पर्याय म्हणुन विचार केला जाऊ शकतो. तरीही स्ट्रेप्टोमायसिनचा प्रभाव थोडा कमी पडु शकतो कारण जिवाणू ह्याचा प्रतिरोध खूप लवकर निर्माण करतात. जेव्हा कीटनाशक वा कोणतेही रसायनिक उत्पादन वापरीत असाल तर संरक्षक कपडे वापरणे आणि लेबलावरील सूचना लक्षपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. नियम देशा-देशात वेगळे असतात, म्हणुन आपल्या भागातील मार्गदर्शनाचे पालन करावे. ह्यामुळे सुरक्षेची खात्री राहून यशस्वी वापराचा संभव वाढतो.
ह्या रोगाचे जिवाणू ऊबदार आणि आर्द्र परिस्थितीत फोफावतात, जी बहुधा पावसाळी वादळानंतर असते. रोग कुठे आणि कसा व्हावा यात वार्याची मोठीच भूमिका असते. तुषार सिंचन केल्यानेही जिवाणूंचा प्रसार त्याचसारखा होतो. तंबाखूच्या झाडाच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा किड्यांनी केलेल्या जखमेतुन जिवाणू आत प्रवेश करतात. आत प्रवेश केल्यानंतर जिवाणू मोठे होतात आणि झाडाच्या आतच पसरत रहातात. जसजसे झाड कूजुन मरु लागते, हे जिवाणू परत हवामानात पसरु लागतात, जिथे ते इतर झाडांवर संक्रमण करु शकतात किंवा जमिनीत सुमारे दोन वर्षांपर्यंत तग धरु शकतात. संक्रमित झाडांचे अवशेष, जमीन किंवा शेती अवजारांद्वारेही हे जिवाणू नवनविन भागात पसरतात.