ऊस

ऊसाची पाने करपवणारा रोग

Xanthomonas albilineans

जीवाणू

थोडक्यात

  • पेन्सिलच्या रेघांसारखे पट्टे पानांवर येतात.
  • पानाची पात पूर्णपणे किंवा अर्धवट पांढरट पडते.
  • पाने वाढ खुंटलेली आणि मरगळलेली असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

लक्षणांचे दोन मुख्य प्रकार (तीव्र किंवा अतितीव्र) आणि दोन टप्पे (अप्रकट आणि ग्रासलेले) आहेत. तीव्र प्रकारात पानाच्या पात्यावर शिरेस समांतर रेषा येतात. ह्या सुमारे १ सें.मी.पर्यंत रुंद असु शकतात. अतितीव्र प्रकारात पक्व झाड अचानक मरगळते. बहुधा बाहेरुन काहीच लक्षणे दिसत नाहीत. रोग सूप्त असु शकतो, काही काळापर्यंत दिसत देखील नाही आणि झाडावर गंभीर संक्रमण झाल्यावरच पहिले लक्षण दिसते. रोगाचे पहिले लक्षण आहे पानांवर पेन्सिलीच्या रेषेसारखे पिवळ्या किनारीचे पट्टे शिरांना समांतर येतात आणि तिथला भाग वाळतो. रोगामुळे फुटवे खुजे होतात आणि मरगळतात. प्रभावित पाने पूर्ण तपकिरी पडण्यापूर्वी बहुधा निस्तेज निळसर हिरव्या रंगाची असतात. तणावपूर्ण परिस्थितीत, पूर्ण फुटवाच वाळतो. पक्व कांडीत, बाजुचे फुटवे टोकाकडुन वाळतात आणि मध्यम ते घनदाट बाजुचे फुटवे येतात. बाजुचे फुटवे बहुधा करपल्यासारखे किंवा पेन्सिलीच्या पांढर्‍या रेषेसारखे दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जंतु मारण्यासाठी बेण्यांना जास्त वेळ गरम पाण्याचे उपचार करा. वाहत्या पाण्यात बेणे थोडा वेळ बुडवुन मग ५० अंश गरम पाण्याचे उपचार केल्याने संक्रमित लागवड सामग्री स्वच्छ होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजपर्यंत या जीवाणू विरुद्ध कोणतीही रसायनिक नियंत्रण पद्धती विकसित करण्यात आलेली नाही.

कशामुळे झाले

झँथोमोनाज अल्बिलिनियन्स जीवाणूमुळे नुकसान उद्भवते. हे जीवाणू ऊसाच्या धसकटात रहातात पण जास्त काळाकरता जमिनीत किंवा न कुजलेल्या पाचटात जगत नाहीत. या रोागाचा प्रसार प्रामुख्याने संक्रमित बेणांमुळे होतो. कापणी करताना आणि बेणे करताना कापणीची हत्यारे आणि यंत्र हा प्रसार होण्याचा महत्वाचे स्त्रोत आहेत. रोगाचे जिवाणू एलिफंट ग्रासासह गवतातही जगतात आणि इथुन त्यांचे वहन ऊसावर होऊ शकते. दुष्काळ, पाणी साचणे आणि कमी तापमान अशा हवामान घटनांनीही रोगाची गंभीरता वाढु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • फक्त रोगमुक्त लागवड सामग्रीच वापरा.
  • लागवड सामग्रीची अदलाबदल आणि वितरणावर, खासकरुन काढणी करताना नियंत्रण ठेवा.
  • ऊसाचे बेणे निवडताना संवेदनशील वाण बाद करा.
  • पर्यायी यजमान काढुन टाका.
  • बेण्याला उष्ण पाण्याचे उपचार करुन जंतुंचा नायनाट करा व नंतर ४ तास ५० अंश गरम पाण्याचे उपचार करा ज्याने संक्रमित लागवड सामग्री स्वच्छ होईल.
  • गरम पाण्याच्या उपचारांनंतर, बेण्यांना कार्बेंडाझिम ५ ग्राम प्रति १० ली.
  • पाण्याच्या द्रावणात १५ मिनीटे बुडवा ज्यामुळे संक्रमण अत्यंत कमी होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा