Pectobacterium carotovorum subsp. carotovorum
जीवाणू
सुरवातीला पाण्याने भिजल्यासारखे भाग तयार होतात. ते मोठे होतात आणि खोलगट तसेच मऊ पडतात. ठिपक्यांखालील झाडाचा भाग मऊ आणि दुधाळ ते काळा असा रंगहीन होतो. गंभीर संक्रमणात पाने, फांद्या आणि मुळे पूर्णपणे कुजतात. घाणेरडा वास देखील येतो.
आजतागायत, ह्या रोगाविरुद्ध कोणत्याही जैविक नियंत्रण माहितीत नाहीत. जर आपणांस ह्याच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता कमी करणारी कोणतीही यशस्वी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जिवाणूचा उपचार करु शकत नसल्याने नियंत्रण उपाय हे फक्त प्रतिबंधक रुपानेच केले जातात. जिवाणूचा प्रतिबंध आणि उपसर्ग दाबण्यासाठी कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचा वापर करा. सिप्रोफ्लॉक्झॅसिनही रोगाचा प्रतिबंध करते.
पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोव्होरम नावाच्या जिवाणू मुळे नुकसान होते जे जमिनीत आणि पिकांच्या अवशेषात तग धरतात. हत्यारे, किडे, गारपिटीमुळे झाडाला झालेल्या जखमातुन आणि नैसर्गिक छिद्रातुन हे जिवाणू आत शिरतात. जिवाणूचे वहन किडे, हत्यारे, संक्रमित झाड सामग्रीचे ने-आण, माती किंवा संक्रमित पाण्यामुळे होते. ओल्या आणि २५-३० अंशाच्या ऊबदार वातावरणात ही खूप मोठी समस्या बनते आणि जर झाडांना कॅल्शियमची कमतरता असेल तर ती अधिकच गंभीरही होते. ह्यांची लागण फक्त शेतातच नव्हे तर साठवणीतही होऊ शकते.