डाळिंब

डाळिंबावरील जिवाणूजन्य करपा (तेल्या रोग)

Xanthomonas axonopodis pv. punicae

जीवाणू

थोडक्यात

  • पान, काटक्या आणि फळे प्रभावित होतात.
  • पिवळसर पाणी शोषल्यासारखे गोलाकार ठिपके येतात.
  • अकाली पानगळ प्राबल्याने दिसते.
  • फळे तडकलेली दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

डाळिंब

लक्षणे

संक्रमणानंतर २-३ दिवसांनी लक्षणे पहिल्यांदा दिसतात. झाडावर पिवळसर पाणी शोषलेले गोलाकार ठिपके दिसतात. गंभीर संक्रमणात अकाली पानगळ होते. कालांतराने हे गोलाकार ठिपके अनियमित व्रणात बदलतात. हळुहळु ठिपके करपून गडद तपकिरी होतात. खोड आणि फांद्यांनाडागांनी वेढल्यामुळे खाच तयार होते व तेथुन फांदी मोडते. अत्याधिक संक्रमणात पान व फांद्या वाळतात. फळांवर या डागांमुळे तडे जातात व अखेरीस पूर्ण फळच गडद होऊन वाळते. जीवनक्रमातील सर्व टप्प्यांवर झाडे या रोगासाठी संवेदनशील असतात

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनाज फ्लौरसेन्स आणि ट्रायकोडर्मा हरझियानम सारख्या जैवनियंत्रक घटकांचा वापर करावा. नीमच्या पानांना गोमुत्रात भिजवुन कीड आणि जंतूंच्या नियंत्रणासाठी फवारणी करा. तुळशीच्या पानांचा अर्क ४०% व त्या नंतर निंबोळी तेलाचा वापर करा. लसूण कंदांचा अर्क, मेसवाकची फांदी आणि पचौलीची पाने ३०% तीव्रतेने वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या रोगावर आजतागायत तरी कोणतेही रसायनिक नियंत्रण सापडलेले नाही. अनेक व्यवस्थापन पर्यात ज्यात येतात प्रतिजैविकांचा वापर, रसायने आणि इतर पारंपारिक उपचारांचा विचार केला गेला आहे पण रसायनिक उपचार खूप कमी प्रभावी ठरले आहेत. बोर्डो मिश्रण, कप्तान, कॉपर हायड्रॉक्साइड, ब्रोमोपोल आणि प्रतिजैविक स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर एकेकटा किंवा संयुगातुन केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

झँथोमोनाज अॅक्झोनोपोडिस प्रजाती पुनिके या हवेतील जीवाणूंमुळे नुकसान उद्भवते. विस्तृत श्रेणीच्या लागवड केलेल्या वाणांना वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर जीवाणू संक्रमित करतो. झाडाच्या नैसर्गिक छिद्रातुन आणि जखमातुन जीवाणू आत शिरतो. संक्रमित झाडांच्या पान, फांद्या आणि फळांत आपली सुप्तावस्था घालवतात. पावसाचे उडणारे पाणी, किडे आणि छाटणीच्या दूषित उपकरणांद्वारे याचा प्रसार स्थानिकरीत्या होतो. दिवसाचे जास्त तापमान आणि कमी आर्द्रता या जिवाणूच्या वाढीस अनुकूल आहे. जिवाणूच्या वाढीस ३० अंश तापमान इष्टतम आहे. पाऊस आणि फवारणीमध्ये उडणारे पाणी, सिंचन, छाटणीची उपकरणे, मानव आणि वाहक किडे या जिवाणूच्या दुय्यम संक्रमणासाठी जबाबदार आहेत. रोगामुळे फळांची विपणन क्षमता कमी होते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगमुक्त रोपे लागवडीसाठी निवडा.
  • लागवड योग्य वेळी आणि योग्य अंतरावर करा.
  • शेत पूर्णपणे निर्जंतुक करा.
  • पर्यायी यजमान झाड नष्ट करा.
  • शेणखत आणि रासायनिक खते माती परिक्षणाच्या शिफारशीप्रमाणे द्या.
  • पिकाच्या महत्वाच्या (फुलधारणा) काळात सिंचन पुरवा.
  • पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
  • झाडांचे अवशेष गोळा करुन नष्ट करा.
  • प्रभावित फांद्या आणि फळे नियमितपणे छाटुन जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा