वांगी

वांग्यावरील बोकड्या किंवा पर्णगुच्छ

Phytoplasma

जीवाणू

थोडक्यात

  • पानांचा आकार लहान होतो.
  • पाने पिवळी पडतात.
  • फळ उत्पादनात बाधा येते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

वांगी

लक्षणे

संक्रमित झाडांचे वैशिष्ट्य लहान, मऊ, पातळ आणि फिकट पिवळ्या रंगाची विकृत पाने आहे. काटेरी वाणांचे झाड गुळगुळीत होऊन त्यांचे काटे नष्ट होतात. झाडाची बहुधा वाढ खुंटलेली असते आणि पेरे तसेच देठही लहानच असतात. निरोगी झाडांपेक्षाही मोठ्या प्रमाणात फांद्या आणि मूळ फुटतात ज्यामुळे ती झुडपासारखी दिसु लागतात म्हणुन त्यांना चेटकीची झाडू असेही म्हटले जाते. फुलांचे भाग (फयलॉडी) विकृत आणि बहुधा वांझ होतात. फळे विकसित होताना टणक, कडक होतात आणि अकाली गळतात. हा रोग जसा वाढत जातो तसा नवीन वाढणारी पाने त्याच्या मूळ आकाराच्या फक्त १/३ -१/४ च वाढतात

शिफारशी

जैविक नियंत्रण

लेसविंग, डॅमसेल बग, मायन्यूट पायरेट बग यासारखे मित्र किडी या किड्यांची अंडी आणि अळ्या खातात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वाहक किडींचा नियंत्रण करण्यासाठी थयोमेथोक्झॅम, अॅसेटामिप्रिड, थयोसयक्लाम आणि मॅलेथियॉनचा वापर केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

लक्षणे बहुधा फायटोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूसारख्या परजीवींमुळे होतात. या रोगाचा एका झाडातून दुसऱ्या झाडात वहन बहुधा वाहक किडींद्वारे, तुडतुडे खासकरुन हिशिमोनाज फयसिटिसद्वारे होते. झाडाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर हे प्रभावित करु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • पॅडागोडा सारखी रोग प्रतिकारक वाण लावा.
  • मिरची/ ढोबळी मिरची सारख्या पर्यायी यजमानांची लागवड करणे टाळा.
  • लागवडीचे अंतर योग्य ठेवा शक्यतो ३ x २ फुट लागवड योग्य राहील.
  • वाहक किड्यांचा परमोच्च हंगाम टळेल अशी वेळ साधुन लागवड करा.
  • तुडतुड्याच्या प्रादुर्भावासाठी शेताचे नियमित निरीक्षण करुन ते रोगमुक्त राखण्याची खात्री करा.
  • संक्रमित झाड दिसताक्षणीच काढुन नष्ट करा.
  • संवेदनशील पर्यायी यजमान झाडाचा (तण) निर्मुलन करा.
  • शेतासभोवताली अडथळा पिके उभारुन वाहक किडे आपल्या पिकाला थेट प्रादुर्भाव करणार नाही याची काळजी घ्या.
  • नैसर्गिक शत्रु आणि मित्र किडी जोपासा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा