Xanthomonas vasicola pv. vasculorum
जीवाणू
लक्षणे पहिल्यांदा झाडीच्या खालच्या भागात दिसतात आणि अनुकूल परिस्थितीत वर चढतात. अरुंद, नारंगी किंवा गव्हाळ रंगाच्या व वेगवेगळ्या लांबीच्या पट्ट्या पानांवर विकसित होतात. पानांवरील जिवाणूजन्य पट्ट्यांची कडा नागमोडी, अर्धपारदर्शक आणि पिवळसर छटेची असते, जर सुर्यासमोर पान धरले तर व्रण ठळक पिवळे दिसतात. काही बाबतीत पहिल्यांदा मध्यावर किंवा झाडीच्या वरच्या भागातही दिसु शकतात. वाणांप्रमाणे लक्षणे विविध आकाराची, छोट्या डागांपासुन ते पानाचा ५०% भाग ग्रासणारी असु शकतात. ज्यामुळे दाणे भरण्यावर आणि उत्पन्नावर परिणाम होतो. पानांवर सोडलेला विषारी स्त्राव हे ही रोगाचे अन्य लक्षण असु शकते.
ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैव उपचार सध्या तरी उपलब्ध नाहीत. ह्याच्या घटना टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपायांची गरज आहे. जर आपल्याकडे माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगाच्या घटना आणि लागणीच्या नियंत्रणासाठी सध्यातरी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत.
झँथोमोनाज व्हॅसिकोलाची प्रजाती व्हॅस्क्युलोरम जे संक्रमित रोपांच्या अवशेषात जीवाणू विश्रांती घेतात. ह्याचा प्रसार पावसाच्या उडणार्या पाण्याने आणि वार्याने निरोगी रोपांच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात होतो. संक्रमित रोपांच्या अवशेषातुन शेतात ह्या जीवाणूंचा प्रसार शेतकामाच्या उपकरणांद्वारे, काढणी करणार्यांद्वारे, वार्याने किंवा गुरांना अवशेष खायला देण्यानेही होतो. जीवाणू रोपांत थेट विना जखमांचा आत शिरु शकतो. त्याच शेतात जर जीवाणू विश्रांती घेत असेल आणि काहीही उपाय न करता संवेदनशील रोपे लावलेली असतील तर संक्रमण काही वर्षांनीही होऊ शकते. रोगाच्या विकासासाठी जास्त सापेक्ष आर्द्रता, भरपूर पाऊस आणि फार काळ पाने ओली रहाणे, हे फार अनुकूल असते. फवारा सिंचन आणि उष्ण काळातील सिंचनामुळे रोगाच्या घटना वाढतात असे दिसुन आले आहे.