Xanthomonas spp. & Pseudomonas syringae pv. tomato
जीवाणू
हे जीवाणू टोमॅटोची झाडी, फांद्या आणि फळांवर हल्ला करतात. जिवाणूजन्य डागांची पहिली लक्षणे कोवळ्या पानांवर, बारीक पिवळट हिरवे डाग येतात तर जिवाणूजन्य ठिपक्यांमुळे अरुंद पिवळ्या प्रभावळीचे काळे ठिपके येतात. पानांच्या कडांना किंवा टोकांवर हे बहुधा जास्त संख्येने असतात आणि ती पाने विकृत आणि मुडपलेली असतात. गंभीर संक्रमणात जिवाणूजन्य स्पेकचे ठिपके एकमेकात मिसळतात किंवा एकावर एक येतात ज्यामुळे मोठे आणि अनियमित डाग तयार होतात. जिवाणूजन्य ठिपक्यांचे डाग सुमारे ०.२५ ते ०.५ सें.मी. मोठे होतात आणि गव्हाळ ते तपकिरी लाल रंगाचे होतात आणि जेव्हा ह्या डागांचे केंद्र सुकते आणि गळते ज्यामुळे बंदुकीने गोळी मारल्यासारखा परिणाम दिसतो. जिवाणूजन्य डाग अशाचप्रकारचे डाग फळांवरही सोडतात जसे ते पानांवर सोडतात आणि जे अखेरीस खडबडीत होऊन तपकिरी आणि खपलीदार होतात तर जीवाणूजन्य ठिपक्यांमुळे बरीक, थोडेसे उंचवटलेले काळे ठिपके येतात. खासकरुन सुरवातीच्या टप्प्यांवर ह्या दोन रोगांना वेगळे ओळखणे कठिण असते.
जंतुंच्या डागांचा उपचार फार कठिण आणि महागडा आहे.जर मोसमात रोगाची लागण लवकर झाली तर पूर्ण पीकच नष्ट करण्याचा विचार करा. कॉपर असणारे जंतुनाशक, डाग आणि ठिपके दोन्हींपासुन झाडी आणि फळांना सुरक्षा कवच देतात. जंतुंचे विषाणू (बॅक्टेरियोफेजेस) जे फक्त जंतुंना मारतात ते जिवाणूजन्य डागांसाठी उपलब्ध आहेत. बियाणांना एक मिनीटभर १.३% सोडियम हापोक्लोराइटमध्ये किंवा गरम पाण्यात (५० डिग्री सेल्शियस) २५ मिनीटांसाठी बुडवुन ठेवल्यास ह्या दोन्ही रोगांच्या घटना कमी होतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपर असणारे जंतुनाशक सुरक्षा म्हणुन वापरले जाऊ शकते आणि रोगावर थोडे नियंत्रण मिळविता येते. रोगाचे पहिले लक्षण दिसताच आणि नंतर दर १०-१४ दिवसांनी जेव्हा ऊबदार (स्पॉट)/ थंड (स्पेक) आर्द्र परिस्थिती असेल तेव्हा वापर करा. कॉपरचा प्रतिकार निर्माण होण्याच्या घटनाही वारंवार घडतात, म्हणुन कॉपरवर आधारीत जंतुनाशकांबरोबर मँकोझेबचाही उपयोग करावा अशी शिफारस केली जाते.
जिवाणूजन्य डाग आणि ठिपके झँथोमोनाज आणि स्युडोमोनाज सिरिन्गे पीव्ही. टोमॅटो, जातीच्या अनेक प्रजातींमुळे उद्भवतात. हे जगभरात सापडतात आणि ऊबदार, आर्द्र हवामानात वाढविल्या जाणार्या टोमॅटोंसाठी हे फारच विनाशकारी असतात. जंतु बियांत किंवा बियांवर, झाडांच्या अवशेषात आणि काही ठराविक तणांत रहातात. जमिनीतील झँथोमोनाजचा जगण्याचा काळ फारच थोडा म्हणजे काही दिवसांपासुन ते अठवड्यांपर्यंतच आहे. दुय्यम संक्रमण पावसामुळे किंवा तुषार सिंचनामुळे होऊ शकते. पानाच्या नैसर्गिक छिद्रातुन आणि जखमांतुन ते रोपात शिरतात. जिवाणूजन्य डागांसाठी २५ ते ३० डिग्री सेल्शियसचे तापमान फार अनुकूल असते. एकदा का पीक संक्रमित झाले तर मग रोगाचे नियंत्रण करणे फार कठिण आहे आणि पूर्ण पीकच बरबाद होऊ शकते. जिवाणूजन्य ठिपक्यांचा उद्रेक हा सापेक्षत: क्वचितच होतो आणि पाने फार काळ ओली रहाणे तसेच थंड हवामान हे अनुकूल असतात.