Xanthomonas campestris pv. musacearum
जीवाणू
संक्रमण झाल्यानंतर शक्यतो ३ अठवड्यांनी लक्षणे दिसतात. वाण, वाढीचा टप्पा आणि हवामान परिस्थितीवर रोगाची गंभीरता आणि प्रसार खूप जास्त अवलंबुन असतात. संक्रमित रोपात वाढता पिवळेपणा, पान वाळणे, एकसारखे परिपक्व न होणे तसेच अकाली पिकणे यासारखी लक्षणे दिसुन येतात. तरीपण झाडाच्या विविध भागातुन जीवाणूचा पिवळसर स्त्राव गळणे हे सर्वात जास्त वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. संक्रमित केळीचा आडवा काप केला असता शीरात पिवळी नारिंगी रंगहीनता दिसते आणि गरामध्ये गडद तपकिरी रेषा पडलेल्या दिसतात. फुलातील लक्षणात पुष्पकोष हळुहळु वाळतात आणि नर कळ्यांचे आक्रसणे दिसते.
आजपर्यंत, या जिवाणूविरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या जिवाणूमुळे होणार्या रोगांच्या व्यवस्थापनाकरता पारंपारिक प्रतिजैवके वापरली गेली आहेत पण ती क्वचितच खर्चाचा ताळमेळ जमवु शकतात. संक्रमित केळीच्या पिकाला नष्ट करुन प्रसार रोखण्यासाठी काही वेळा तणनाशकांचा वापर जास्त आर्थिक आणि प्रभावी मार्ग म्हणून सल्ला दिला गेला आहे.
झँथोमोनाज कँपेस्ट्रिस पीव्ही. मुसासीरम नावाच्या जिवाणूमुळे लक्षणे उद्भवतात. हे एक विशेषतः चिकाटीचे जीवाणू आहेत ज्यामुळे केळीच्या बागायतीमध्ये लक्षणीय नुकसान होऊ शकते. या जीवाणूचा प्रसार, संक्रमित झाडांची सामग्री, दूषित हत्यारे, उडणार्या वाहकांद्वारे उमललेल्या नर फुलांतुन होतो. जीवाणू मातीला देखील संक्रमित करुन त्याद्वारे ४ महिन्यांपर्यंत प्रभावित करु शकतात आणि हाच संक्रमणाचा मुख्य स्त्रोत आहे. जमिनीतील ओलाव्याच्या पातळीवर या जीवाणूची उपजीविका होते, जी कोरड्या जमिनीमध्ये सर्वात कमी असते. नांगीविरहित मधमाश्या (अॅपिडे), फळमाशी (ड्रॊसोफिलिडे) आणि गवती माशा (क्लोरोपिडे) यांच्या प्रजाती उडणार्या वाहकात येतात. हे किडे नर फुलांतील संक्रमित मकरांद्वारे एका केळीतुन दुसऱ्या केळीत रोगाचा प्रसार करतात.