Acidovorax citrulli
जीवाणू
लागवड केल्यानंतर पाच ते आठ दिवसांनी रोपांवर लक्षणे दिसतात. खोलगट पानांच्या खालच्या बाजुला पाणी शोषल्यासारखे धब्बे आणि क्वचित कोलमडणेही लक्षणात दिसुन येते. जुन्या रोपात, गडद किंवा लालसर तपकिरी कोणेदार डाग पानांच्या शिरांजवळ दिसतात. फळांवरील लक्षणे विशेषकरुन तयार होण्याच्या थोडे आधी दिसतात आणि पृष्ठभागावरील छोट्या, ऑलिव्ह रंगाच्या, बेढब डागांच्या रुपात दिसतात. हे डाग झपाट्याने एकत्रित वाढतात आणि एकमेकात मिसळुन मोठे गडद हिरवे धब्बे तयार होतात. जसजसा रोग वाढत जातो तसतसे ह्या डागांच्या भागात भेगा तयार होतात आणि त्यातुन पिवळसर तपकिरी स्त्राव झिरपु लागतो. संधीसाधु जंतु ह्या नुकसानीत भागात घर करतात ज्यामुळे फळे आतुन सडु लागतात.
कोरडे उष्ण उपचार बियाणांवर करुन काही प्रमाणात बियाणे जंतुमुक्त केली जाऊ शकतात. ८५ डिग्रीचे उपचार ३-५ दिवसांपर्यंत केल्यास जंतुंचा नायनाट परिणामकारकपणे होतो. रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी आणि फळांना संक्रमणापासुन वाचविण्यासाठी कॉपरवर आधारीत जिवाणूनाशकांची सेंद्रिय द्रावणे उपलब्ध आहेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर हा रोग शेतात सापडला, तर क्युप्रिक हायड्रॉक्साइड, कॉपर हायड्रोसल्फेट किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड सारखी कॉपरवर आधारीत जंतुनाशके त्यांचा प्रसार कमी करतात आणि फळांना संक्रमणापासुन वाचवितात. ह्याचा वापर फुले येण्याच्या काळात किंवा त्यापूर्वी करायला सुरवात करावी आणि फळे तयार होईपर्यंत करत रहावे.
अॅसिडोव्होरॅक्स सिट्रुलि नावाच्या जिवाणूमुऴे ही लक्षणे उद्भवतात जो संक्रमित फळाच्या बियाणात, जमिनीतील रोपाच्या अवशेषात आणि काकडीवर्गीय कुटुंबाच्या तणात किंवा स्वयंभू रोपात रहातात. पूर्ण काकडीवर्गीय ह्या रोगास काही पातळीपर्यंत ह्या रोगास संवेदनशील आहेत पण लक्षणांच्या गंभीरतेत फरक आहे. रोगाचा प्राथमिक प्रसार होण्यासाठी संक्रमित बियाणे हा महत्वाचा घटक मानला गेला आहे. दुय्यम संक्रमण झाडाझाडावर उडणार्या पाण्याने (पावसाचे किंवा फवारा सिंचनाचे), कामगारांच्या हाताने तसेच कपड्यांनी, हत्यारांनी तसेच अवजारांनीही होते. संक्रमण आणि रोगास उच्च तापमान (३२ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त) आणि उच्च सापेक्ष आर्द्रता (७०%पेक्षा जास्त) भावते. फुलांच्या परागीकरणांतुन फळे आणि फुले आल्यानंतर २-३ अठवड्यांनी संक्रमित होऊ शकतात. पण जसे फळ वयात येते, त्याच्या पृष्ठभागावर मेणचट थर येतो ज्यामुळे आणखीन संक्रमण होऊ शकत नाही.