Xanthomonas citri subsp. malvacearum
जीवाणू
जिवाणूजन्य करप्याची सुरवात पान, फांदी आणि बोंडांवरील कोणेदार, मेणचट आणि पाणी शोषल्यासारख्या, लाल ते तपकिरी कडा असणार्या, ठिपक्यांनी होते. ठिपके कोणेदार दिसणे हे कपाशीच्या पानातील शिरांनी व्रणांना अडविल्यामुळे होते. काही वेळा हे पानाच्या पात्यावरील ठिपके मुख्य शिरांना समांतर वाढतात. जसा रोग वाढतो, तसे हे ठिपके तपकिरी पडतात आणि त्या शेजारील भाग करपतात. फांदीवरील संक्रमणाने काळे कँकर्स वाहक भागांना वेढुन वाढतात, ज्यामुळे कँकर्सच्या वरील भाग वाळतो ज्यामुळे झाडाची अकाली पानगळ होते. कँकर्समध्ये किंवा पानांच्या जुन्या डागात पांढरे मेणचट कवच तयार होते ज्यात जीवाणू असतात. बोंड संक्रमित होऊन कुजतात, बिया देखील कुजतात आणि रुई रंगहीन होते. संक्रमित बोंडांवर कोणेदारपेक्षा गोल ठिपके येतात जे सुरवातीला पाणी शोषल्यासारखे दिसतात. जसे संक्रमण वाढते, बोंडावरील व्रण खोलगट आणि गडद तपकिरी किंवा काळे होतात.
सुडोमोनस फ्ल्युरोसेनस आणि बॅसिलस सबटिलिस जुंत असणार्या टाल्क आधारीत पावडरीच्या द्रावणांचा वापर एक्स. माल्व्हॅसिरमविरुद्ध चांगले परिणाम देतो. अॅझाडिराक्टा इन्डिका (नीम अर्क)चा अर्क वापरा. वाढ नियंत्रक उत्पाद जे अनियंत्रित वाढ थांबवतात ते वापरुन सुद्धा जिवाणूजन्य करप्याचे संक्रमण टाळले जाऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अधिकृत प्रतिजैवकांसोबत कॉपर ऑक्झिक्लोराइडचे बीजोपचार केल्याने देखील कपाशीवर जिवाणूजन्य करपा देणार्या जंतुंविरुद्ध चांगला प्रभाव मिळतो.
झँथोमोनाज सिट्रिच्या उपप्रजाती मालवेसेरममुळे कपाशीत जिवाणूजन्य करपा उद्भवतो. हे जीवाणू संक्रमित झाडांच्या अवशेषात आणि बियाणात जगतात. हा कपाशीवरील सर्वात जास्त नुकसान करणारा रोग आहे. जोरदार पाऊस आणि उच्च आर्द्रता याबरोबर ऊबदार तापमान, रोगाच्या वाढीस अनुकूल असते. जीवाणू पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा शेतात काम करताना झालेल्या जखमांतुन पानात शिरतात. जोरदार वादळी पाऊस किंवा गारपीट झाली असता रोग सर्वात जास्त गंभीर का असतो ते यावरुन कळते. संक्रमण बियाणांद्वारे असल्याने, दूषित बियाणांना आम्ल उपचार करुन जीवाणूंचा प्रसार कमी केला जाऊ शकतो. स्वयंभु झाडाचे रोप देखील जीवाणूजन्य करप्याच्या संक्रमणाचे प्राथमिक स्त्रोत असु शकतात.