Erwinia tracheiphila
जीवाणू
काकडीवर्गीयातील जिवाणूजन्य मर ही बहुधा वरील पानांपासुन सुरु होते. ही पाने कमी ताजी तवानी दिसतात आणि जर रोग वाढीव असेल तर त्याच्या कडा तपकिरी होतात. प्रभावित झाड दिवसा मरगळते आणि दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा ताजेतवाने दिसते. तसेच मरगळेल्या पानांची फांदी जर हळुवारपणे वेगळी ओढलीत तर आपणास जिवाणूचे चिकट धागे दिसतात. तसेच, ह्या चिकटपणाचे नसणे ह्याचा अर्थ असा होत नाही कि झाडावर संक्रमण झालेले नाही, पण हा चिकटपणा असणे हे रोगाच्या असण्याचा खास पुरावा आहे.
जर फक्त काही झाडांवरच रोगाची लक्षण दिसत असतील तर रोग प्रसार टाळण्यासाठी त्यांना काढुन खोल पुरा. सापळा पिकेही जी काकडीवर्गीय झाडांचे प्रकार आहेत आणि जे किडींना फार आकर्षित करतात, ती लावु शकता. ही सापळा पिके आपल्या मूळ पिकांपासुन किडींना आकर्षित करतात.
लक्षात असू द्यात, एकदा का जिवाणूजन्य मर झाडास लागली कि रोगाचे थेट नियंत्रण करणे शक्य नसते म्हणुनच बीटल व्यवस्थापन करुन प्रतिबंध करणे हाच एक उपाय आहे. जर आपणांस काकडीवरील दोन बीटल्स आपल्या झाडाच्या एक चतुर्थांश भागात, रोगाच्या सुरवातीच्या काळात दिसले, तर किटकनाशके वापरण्याचा विचार जरुर करा. जेव्हा झाडे जून होतात तेव्हा हेच गणित वाढुन ८ बीटल्स प्रति एक चतुर्थांश झाड असे होते. बीटल्सनी निरोगी झाडांना संक्रमित करु नये ह्यासाठी कोणतेही झाड जे जिवाणूजन्य मर दर्शविते त्यास काढुन टाकणे महत्वाचे आहे. कीटकनाशकाचा एक पातळ, एकसंध थर पूर्ण झाडावर द्यावा खासकरुन जिथे खोड मातीतुन वर येते आणि पानांच्या खालच्या बाजुस जिथे बीटल्सना लपायला आवडते.
जिवाणूजन्य मर, खासकरुन काकडीवर सर्वसामान्य असते जी जिवाणूमुळे होते ज्यांचा प्रसार ठराविक किडींद्वारे - काकडीवरील पट्टेवाले आणि ठिपकेवाले बीटल्स, ह्यांद्वारे केला जातो. हे बीटल्स ह्या जिवाणू पूर्ण हिवाळाभर त्यांच्या पोटात घेऊन हिंडतात. संक्रमित झाडांना खाल्ल्याने त्यांनाही संसर्ग होतो आणि नंतर ते ह्या जीवाणूंना निरोगी झाडांना खाताना सोडतात. एकदा का जिवाणू झाडात शिरले कि ते झपाट्याने वाढतात आणि रोपाच्या वहन संस्थेस बंद पाडतात, ज्यामुळे मर होते. हे जिवाणू बियाणांद्वारे पसरत नाहीत, मातीत रहात नाहीत आणि फक्त थोड्याच काळासाठी झाडाच्या गळलेल्या अवशेषांमध्ये राहू शकतात.