Xanthomonas axonopodis pv. manihotis
जीवाणू
लक्षणात करपा, मर, डाय बॅक आणि वाहक भागांचे वाळणे येते. पानांवर कोनाकृती वाळलेले ठिपके दिसतात जे पानाच्या छोट्या शिरांनी सीमित असतात आणि अनियमितपणे पानांवर विखुरलेले असतात. या ठिपक्यांसभोवताली बहुधा पिवळी प्रभावळ असते. हे ठिपके स्पष्ट तपकिरी डाग म्हणुन देठाजवळील भागातुन सुरवात होते मग ते मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि पूर्ण पान वाळते. या जखमातून निघालेला चिकट स्त्राव पानांच्या आडव्या तिडव्या शिरांवर गोळा होतो. ह्याची प्रक्रिया सोनेरी चिकट स्त्राव गळण्याने सुरु होते जो स्त्राव नंतर टणक होऊन पिवळसर खपली धरते. संक्रमणानंतर कोवळ्या फांद्या आणि देठांना देखील चिरा जाऊन त्यातुन डिंक वाहू लागतो.
संक्रमित बियाणे ६० अंश गरम पाण्यात २० मिनिटांसाठी भिजवुन, उथळ थरांमध्ये ३० अंश तापमानात रात्रभर किंवा ५० अंश तापमानात ४ तास ठेवल्याने जिवाणूची संख्या खूप कमी होते. बियाणांना पाण्यात टाकून मायक्रोव्हेव्ह ओव्हनमध्ये ठेऊन पाण्याचे तापमान ७३ अंश होईपर्यंत थांबावे नंतर लगेच पाणी फेकुन द्यावे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आत्ता तरी अरारुटवरील जिवाणूजन्य करप्यावर थेट रसायनिक नियंत्रण उपलब्ध नाही. जर आपणांस काही माहिती असल्यास आम्हाला जरुर कळवा. जिवाणूची उपस्थिती कृपया क्वारंटाईन अधिकार्यांना जरुर कळवा.
झँथोमोनस अॅक्सोनोपोडिस नावाच्या जिवाणूच्या प्रजातींमुळे ही लक्षणे उद्भवतात जे झपाट्याने अरारुटच्या झाडाला (मॅनिहोटिस) संक्रमित करतात. पिकात (किंवा शेतात) जिवाणूचा प्रसार वार्याने किंवा पावसाच्या उडणार्या पाण्याने होतो. दूषित शेती उपकरणे तसेच खासकरुन पावसात किंवा पावसानंतर, मानवी आणि प्राण्यांची लागवडीतुन होणारी ये-जाही प्रसाराची महत्वाची साधने आहेत. तरीही खास करुन आफ्रिका आणि आशियात, ह्या जिवाणूचे लांब अंतरावरील वहन हे दृष्य लक्षणविरहित लागवड सामग्री, कलमे आणि बियाणे ह्यांद्वारे होते. संक्रमण प्रक्रिया आणि रोगाचा विकास ह्यास ९०-१००% सापेक्ष आर्द्रतेसह इष्टतम तापमान २२-३० अंश असल्यास १२ तास लागतात. जिवाणू अनेक महिने फांद्यात, डिंकात तग धरुन रहातो आणि पावसाळी काळात परत नव्याने कार्य सुरु करतो. ह्या जिवाणूचा एकच लक्षात घेण्यासारखा यजमान आहे तो म्हणजे युफोर्बिया पुलचेरिमा (पॉइंसेटिया) नावाचे शोभेचे झाड.