Pseudomonas syringae pv. syringae
जीवाणू
या रोगाची वैशीष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत, पानाच्या पात्याच्या बुडाजवळ पाणी शोषल्यासारखे डाग येणे आणि देठांवर काळे भाग असणे होय. कालांतराने हे डाग मोठे होऊन पानाच्या मध्यशीरेपर्यंत पसरतात आणि देठाच्या बुडाच्या आजुबाजुला असणार्या फांद्यांवर देखील पसरतात. नंतर पाने वाळतात, गोळा होतात पण फांदीला चिकटुनच रहातात. अखेरीस ती बहुधा देठाशिवाय गळतात. फांदीवरील करपट भाग अजुन वाढतात आणि फांद्यांना जर पूर्णपणे ग्रासले गेले तर अखेरीस २०-३० दिवसात वाळतात. रोपावाटिकेतील माल काही दिवसातच करपतो आणि लक्षणे काहीशी फायटोप्थोराच्या संक्रमणासारखी असतात. लक्षणे कमी गंभीर असतात आणि ऊबदार किंवा कोरड्या हवेत पूर्णपणे नाहीशी देखील होऊ शकतात. फळांवरील संक्रमण क्वचितदा संत्र्याच्या सालीवर बारीक काळ्या ठिपक्यांच्या रुपात दिसते. संत्री, लिंबु आणि मँडेरिनच्या झाडात सर्वात वाईट लक्षणे दिसतात.
या रोगाची गंभीरता आणि घटनांचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैविक उपचार माहितीत नाहीत. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. बोर्डो द्रावणांसारखी कॉपरची मिश्रणे सेंद्रिय व्यवस्थापन केलेल्या बागेत देखील फवारणीसाठी वापरण्यास शिफारस करण्यात येते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बोर्डो द्रावणांसारखी कॉपरची मिश्रणे सेंद्रिय व्यवस्थापन केलेल्या बागेत देखील फवारणीसाठी वापरण्यास शिफारस करण्यात येते. प्रत्येक वर्षी थंड आणि ओले हवामान सुरु होण्यापूर्वी एकदा उपचार करावेत. फेरिक क्लोराइड किंवा मँकोझेबला क्युप्रिक हायड्रॉक्साइडबरोबर मिसळल्यास ज्या प्रजातींनी काही वर्षांपासुन प्रतिकार निर्माण केला आहे त्यांवर देखील चांगले नियंत्रण मिळते.
सुडोमोनस सिरिंगे पीव्ही. सिरिंगे नावाच्या जिवाणूमुळे सिट्रस हे रोग होतो, जो बर्याचशा लिंबुवर्गीय पिकांना संक्रमित करतो. हे जिवाणू बहुधा पानांच्या पृष्ठभागावर रहातात आणि दीर्घकाळ ओल्या हवेत ते संक्रमण करु शकतात. ते झाडात पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा पानांना पडलेल्या भेगांतुन किंवा फांदीला झालेल्या जखमातुन प्रवेश करतात. वारा, जोरदार पाऊस, वाळुचे वादळ आणि बर्फवृष्टीमुळे झाडाच्या भागांना जखमा झाल्यास त्यातुन जंतु झाडात प्रवेश करतो. पानांचे ओलेपण काही दिवसांसाठी सतत रहाणे संक्रमण होण्यासाठी गरजेचे आहे. कोवळी पाने जी पूर्ण मोठी झालेली नाहीत किंवा थंडीच्या आधी पक्व झालेली नाहीत ती जास्त संवेदनशील असतात.