खरबूज

अॅस्टर पिकावरील फायटोप्लास्मा मर

Phytoplasma asteris

जीवाणू

थोडक्यात

  • पानाच्या पूर्ण पात्यापर्यंत जाणार्‍या शिरा साफ होतात.
  • फुले विद्रुप आणि हिरवट होतात, त्यांच्या पाकळ्या पानांसारख्या होतात आणि लागणारी फुले वांझ असतात.
  • एकुणच रोपाची मूळ प्रणाली चांगली वाढत नाही आणि दिसायला खुजी असतात.

मध्ये देखील मिळू शकते

8 पिके
कारले
कोबी
गाजर
लेट्यूस
अधिक

खरबूज

लक्षणे

फायटोप्लास्माची कोणती प्रजाती संक्रमण करीत आहे, संक्रमणाच्या वेळी रोपाचे वय काय आहे, रोपाचे वाण कुठचे आहे आणि तापमान तसेच आर्द्रता यासारख्या पर्यावरणीय घटकांमुळे वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांची शृंखला थोडी बदलु शकते. वनस्पतीनाशक नुकसानासारखीच ही लक्षणेही दिसतात आणि शिरा साफ होण्यानेच बहुधा प्रकट होतात. नंतर पानाच्या उरलेल्या भागात पूर्ण पान झाकोळले जाईपर्यंत पिवळेपणा भरत रहातो. काही पिकात ह्याऐवजी झाडी लालसर होते. फुले विद्रुप आणि हिरवट होणे, त्यांच्या पाकळ्या पानांसारख्या असणे आणि वांझ फुलधारणा ही इतर काही लक्षणात येतात. एकुण रोपाची मूळ प्रणाली चांगली विकसित होत नाही आणि खुजी दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

खूपच जास्त संक्रमणाचे नियंत्रण करण्यासाठी मेटार्‍हिझियम अॅनिसोप्लिये, ब्युव्हेरिया बॅसियाना, पायेसिलोमायसेस फ्युमोसोरोसियस आणि व्हर्थिसिलियम लेकॅनि सारख्या परजीवी बुरशीच्या प्रजाती असणारी जैव कीटकनाशके वापरा. अॅनाग्रस अॅटोमस सारख्या परजीवी किड्यांच्या प्रजातीही तुडतुड्यांसाठी जेैव नियंत्रक पद्धत म्हणुन वापरल्या जाऊ शकतात. लेडीबग्ज आणि लेसविंग्जसारखे मित्र किडेही ह्या किड्यांची अंडी आणि अळ्यांना अधाशीपणे खातात. कीटनाशक साबणही काम करतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लँब्डा-सायहॅलोथ्रिन, डायमिथोएट आणि इंडोक्साकार्बचा प्रभाव तुडतुड्यांवर जास्त पडतो आणि त्यामुळे शेतात रोगाचा प्रसार सीमित होतो.

कशामुळे झाले

फायटोप्लास्माअॅस्टेरिस नावाच्या रोपाच्या वहन भागात रहाणार्‍या बंधनकारक परजीवी जंतुंमुळे ही लक्षणे उद्भवतात. ह्यांचे रोपा-रोपावरील वहन बहुतेक वेळा कीटकवाहकांद्वारे होते, मुख्यत: तुडतुड्यांमुळे. ह्या किड्यांना हालचालीसाठी आणि खाण्यासाठी शेतातील अनुकूल परिस्थितीमुळेही फायटोप्लास्माचा प्रसार वाढतो. उदा. वारा, पाऊस किंवा १५ अंशाखालील तापमान ह्यांचे स्थलांतर काही काळापुरते थांबवितात आणि संक्रमणास उशीर होतो. त्या भागातील हवामान परिस्थितीचाही तुडतुड्यांच्या खाण्याच्या पद्धतींवर प्रभाव पडतो. जर परिस्थिती उष्ण असेल तर रोपात पोषके त्यामानाने कमी असतात आणि ती तुडतुड्यांसाठी जास्त आकर्षक रहात नाहीत. ज्या मोसमात भरपूर पाऊस पडतो ज्यामुळे रोपाची चांगली वाढ होते ती जास्त आकर्षक असतात. जोपर्यंत ते शरद ऋतुत त्यांच्या विश्रांती स्थानावर स्थलांतरीत होत नाहीत तोपर्यंत तुडतुडे पूर्ण उन्हाळाभर खात असतात.


प्रतिबंधक उपाय

  • पानावरील तुडतुड्यांच्या उपद्रवाच्या आणि रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • फायटोप्लास्माचा स्त्रोत नष्ट करण्यासाठी आणि प्रसार कमी करण्यासाठी संक्रमित रोपे काढुन टाकली पाहिजेत.
  • हिरव्या तुडतुड्यांना आकर्षित करणारे पिवळे चिकट सापळे वापरा.
  • लेडीबग्ज, परजीवी वॅस्पस आणि लेसविंग्जसारख्या मित्र किड्यांना पूरक असे पर्यावरण राखा.
  • तुडतुडे तणात आणि बारमाही असणार्‍या थिस्टर, डँडिलियॉन आणि गाजरासारख्या शोभेच्या झाडात विश्रांती घेतात म्हणुन ही रोपे शेतात ठेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा