मका

मक्यातील जिवाणूजन्य खोडकुज

Dickeya zeae

जीवाणू

थोडक्यात

  • पाने, पर्णकोष आणि नंतर खोडात रंगहीनता दिसते.
  • घाणेरडा वास येतो आणि झाडाचा वरचा भाग अलगदपणे वेगळा काढता येतो.
  • खोडाच्या आत रंगहीनता आणि चिकट कूज दिसते.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

पान, पर्णकोष आणि खोडाचे पेरे रंगहीन होणे ही मक्यातील जिवाणूजन्य खोडकुजीची वैशिष्ट्य आहेत. रोग नंतर झपाट्याने खोडाभोवती वाढतो आणि इतर पानांवर पसरतो. जसजसे झाडाचे भाग कुजत जातात, तसतसा घाणेरडा वास सुटतो आणि झाडाचा वरचा भाग इतर भागांपासुन अलगद निघुन येतो. या रोगामुळे पूर्णपणे खोडकुज व क्वचितच शेंडेमर होते. खोड उभे चिरले असता आत रंगहीनता आणि चिकट कूज आढळते जी जास्त करुन पेऱ्यात केंद्रित असते. हे जिवाणू एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर संक्रमित होत नसल्याने संक्रमित झाडे शेतात बहुतेक सर्व ठिकाणी विखुरलेली आढळतात. तरीपण काही किडे वाहकांद्वारे जंतु एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर संक्रमित झाल्याचे अहवाल आहेत. अधुन मधुन जोरात पावसाच्या नंतर उच्च तापमान आणि आर्द्र परिस्थिती असलेल्या भागातील मक्याच्या पिकावर हा रोग आढळुन येतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ए. क्रिसॅन्थेमीविरुद्ध सध्यातरी कोणतेही जैविक नियंत्रण उपलब्ध नाही. जर आपणांस माहिती असले तर आम्हाला जरुर कळवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सिंचनाच्या पाण्यात क्लोरीन वापरल्यास किंवा जमिनीस ब्लिचिंग पाडरीच्या द्रावणाने (३३% क्लोरीन १० किलो/हे. दराने) फुलधारणेच्या आधी देण्याची शिफारस करण्यात येते. कॉपर ऑक्झिक्लोराइड असणारी मिश्रणे वापरले असताही या रोगाविरुद्ध चांगले परिणामकारक असते. अखेरीस एमओपीचा ८० किलो/हे. वापर दोन विभाजित भागात केल्यास लक्षणांची गंभीरता कमी होते.

कशामुळे झाले

एर्विनिया क्रिसॅन्थेमि नावाच्या जिवाणूमुळे ही लक्षणे उद्भवतात, जे फक्त खोडाच्या जमिनीवरील अवशेषातच जगतात पण त्यातही ते एका वर्षापेक्षा जास्त जगु शकत नाहीत. हे जिवाणू बियांणांद्वारे संक्रमित होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. रोगाला ३२-३५ डिग्री सेल्शियसचे तापमान आणि उच्च सापेक्ष आर्द्रता अनुकूल असते. वारंवार पाऊस आणि तुषार सिंचनामुळे पाने फार काळ ओली रहातात आणि रोपाभोवती पाणी साचते. जसे हे पाणी तापते, तसे ते रोपाच्या पेशींना नुकसान करते ज्यामुळे संक्रमण होते. ज्या झाडांना उच्च तापमान किंवा साचलेल्या पाण्यात रहावे लागते त्यात लक्षणे त्यांच्या बुडाजवळ विकसित होतात. सिंचनाचे पाणी संक्रमणाचा प्रथम स्त्रोत आहे असे मानले जाते. जरी झाडाच्या इतर पेऱ्याना संक्रमित करण्यासाठी जिवाणू पसरत असले तरी जोपर्यंत जंतुंचे वहन वाहक किडी करत नाही तोपर्यंत शेजारच्या झाडांवर संक्रमण होत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • शेतातुन पाण्याचा निचरा चांगला करुन पाणी जमा होऊ देऊ नका.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • या रोगाची घटना टाळण्यासाठी नत्राचा वापर जास्त करु नका, वापर करताना नेहमीच विभाजित वापर करा आणि रोगाच्या घटना कमी करण्यासाठी नेहमी स्फुरद व पालाशाची मात्रा जास्त ठेऊन वापर करा.
  • झाडाभोवती पाण्याचे वलय होणार नाही यासाठी जास्त गरम वातावरणात सिंचन करणे टाळा.
  • रोगाची साथ येणार्‍या भागात, मक्याची पेरणी करण्यापूर्वी जमिनीत हिरवे खत देण्याची शिफारस शेतकर्‍यांना करण्यात येते.
  • पीक घेतल्यानंतर पीकाचे अवशेष जमिनीत पुरा ज्यामुळे जीवनचक्र तोडले जाईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा