Clavibacter michiganensis
जीवाणू
पानावरील प्राथमिक लक्षणे लांबट गव्हाळ रंगाचे डाग ज्यांच्या कडा अनियमित असून ते शिरांना समांतर उमटतात. कालांतराने संपूर्ण पान करपते, ज्यामुळे झाडोर्याचे मोठे नुकसान होते आणि झाड खोडकुजीला बळी पडते. गडद पाणी शोषल्यासारखे ठिपके डागात तयार होतात. पानांच्या कडा बहुधा करपट होतात. जिवाणूंचा सुकलेला चमकदार स्त्राव आणि काळे ठिपके या डागात दिसुन येतात. खोड संक्रमण झालेल्या झाडात नारिंगी रंगांच्या तंतुंचे गठ्ठे खोडात दिसु शकतात. कोवळ्या रोपावस्थेत संक्रमण झाल्यास काही भागात कोवळी रोपे करपून मर होते.
सी. मिचिगानेसिसचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैविक उपचार सध्यातरी उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आम्हाला सांगा. प्रभावी नियंत्रक उपाय केवळ प्रतिबंधात्मक स्वरुपाचे आहेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सी. मिचिगानेसिसवर सध्यातरी कोणताही रसायनिक नियंत्रण उपाय उपलब्ध नाही. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आम्हाला कळवा. प्रभावी नियंत्रक उपाय केवळ प्रतिबंधात्मक स्वरुपाचे आहेत.
क्लॅव्हीबॅक्टर मिचिगानेसिस नावाच्या जिवाणूमुळे ही लक्षणे उद्भवतात, जे संक्रमित मक्याच्या अवशेषात किंवा ग्रीन फॉक्सटेल, बार्नयार्ड गवत आणि शॅटरकेन सारख्या इतर यजमानांच्या अवशेषात आपली सुप्तावस्था घालवतात. या संक्रमित भागातुन, जिवाणूचे वहन पावसाच्या उडणार्या पाण्याच्या थेंबांनी, सिंचनाच्या हवेत उडणार्या थेंबांनी इतर झाडांवर होते. ज्या पानांना जखम उदा. गारा, जोरदार वार्यामुळे वाळुचे सपकारे आणि मोठ्या तुफानामुळे झाली आहे त्यांवर प्रथमत: या रोगाचे संक्रमण होते. पानात संक्रमण झाल्यानंतर या रोगाचा प्रसार झाडात होतो व त्यानंतर एका झाडावरुन दुसर्या झाडाला होते. रोगाच्या विकसासाठी उबदार हवामान (>२५ डिग्री सेल्शियस) मानवते. लक्षणे बहुधा स्त्रीकेसर आल्यानंतर दिसतात आणि त्यांची गंभीरता त्या टप्प्यानंतर वाढतच जाते. संवेदनशील संकरीत वाण, कमी मशागत आणि एकाच प्रकारचे पीक वारंवार घेणे यामुळे रोगास प्रोत्साहन मिळते.