Burkholderia glumae
जीवाणू
शेतात हा बहुधा गोलाकार पॅटर्न घेतो. ओंबीचे गुच्छ दाणे भरण्याच्या सुमारास चांगले विकसित होत नाहीत आणि ओंब्या दाण्यांच्या वजनाने झुकायला हव्यात तेव्हा सरळ ताठ उभ्या रहातात. संक्रमित दाणे ओंबीवर अनियमितपणे विखुरलेले असतात. संक्रमित ओंबीखालील फांदी हिरवीच रहाते. फुलोर्यातुन विकसित होणार्या दाण्यांना जंतु संसर्ग करतो आणि परागीकरण झाल्यानंतर दाणे गळतात किंवा कुजतात. ओंबी खालील एक तृतियांश ते अर्ध्या भागातील दाण्यात फिकट ते मध्यम तपकिरी रंगहीनता दिसुन येते. ओंबीवर संक्रमित इतर बुरशी किंवा जंतुंमुळे हे दाणे नंतर राखाडीसर, काळे किंवा गुलाबी पडतात.
बुरखोल्डेरिया प्रजातीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. माफ करा, बुरखोल्डेरिया ग्लुमेविरुद्ध कोणतेही रसायनिक उपचार आम्हास ठाऊक नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.
जिवाणुजन्य ओंबी मरचा प्रसार संक्रमित बियाण्यातून होतो. रोगाचा प्रसार तापमानावर अवलंबित आहे. जिवाणुजन्य ओंबी मर जास्त करुन गरम, कोरड्या हवेत रोपाच्या वाढीच्या नंतरच्या टप्प्यावर विकसित होते. जेव्हा तापमान ३२ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असणार्या दिवशी अणि रात्रीचे तापमान २५ डिग्री सेल्शियस किंवा त्यापेक्षा जास्त रहाते तेव्हा ह्यांचा भर जास्त होतो . उच्च नत्राची पातळीसुद्धा या रोगाच्या विकासाला अनुकूल असते. वसंत ऋतुमध्ये लवकर लागवड केलेल्या भातावर जिवाणुजन्य ओंबी मरचे नुकसान ओंबी येताना आणि दाणे भरताना असलेल्या थंड हवामानामुळे कमी दिसते.